• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Special Coverage »
  • Oxygen Enviornment Use Business World Bamboo Day 2025 Navarashtra Pune Special Story

World Bamboo Day: ऑक्सिजनपासून रोजगारापर्यंत….! ‘बांबू’ ठरतो वरदान

बांबूला 'ग्रीन गोल्ड' असे संबोधले जाते. जलद गतीने वाढणारा हा गवतवर्गीय वनस्पतीचा प्रकार जमिनीची धूप रोखतो, पावसाचे पाणी साठवतो व कार्बन डायऑक्साइड शोषून घेतो.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 18, 2025 | 05:25 PM
World Bamboo Day: ऑक्सिजनपासून रोजगारापर्यंत….! ‘बांबू’ ठरतो वरदान

जागतिक बांबू दिवस २०२५ (फोटो- टीम नवराष्ट्र)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
पुणे/सुनयना सोनवणे:  बांबू निसर्गाने माणसाला दिलेले एक वरदान आहे असेच म्हणावे लागेल. शाश्वत विकास, वातावरण बदलावरील रामबाण इलाज आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला उभारी देणारा हा नैसर्गिक घटक म्हणून माणसाच्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग बनत आहे. २००९ साली जागतिक बांबू संघटनेने हे महत्त्व ओळखून ‘बांबू दिन’ साजरा करण्यास सरुवात केली. आज १८ सप्टेंबर रोजी साजरा होणाऱ्या या बांबू दिनानिमित्त बांबू लागवड आणि त्यापासून तयार होणाऱ्या विविध मानवोपयोगी वस्तूंवर काम करणाऱ्या सागर पवार, श्रीकृष्ण परांजपे, विजय सातपुते, अजित ठाकूर यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी बांबू लागवड, त्याचे पर्यावरणावर होणारे सकारात्मक परिणाम आणि ग्रामीण तसेच आदिवासी अर्थव्यवस्थेला मिळणाऱ्या ऊर्जेसंदर्भात सविस्तर गप्पा मारल्या. ‘लोकांसाठी बांबू, ग्रह आणि हवामान कृती’ ही यावर्षीची थीम आहे.
बांबूला ‘ग्रीन गोल्ड’ असे संबोधले जाते. जलद गतीने वाढणारा हा गवतवर्गीय वनस्पतीचा प्रकार जमिनीची धूप रोखतो, पावसाचे पाणी साठवतो व कार्बन डायऑक्साइड शोषून घेतो. हवामान बदलावरील नियंत्रणासाठी बांबू प्रभावी ठरत असून शाश्वत विकासाचे महत्त्वाचे साधन मानले जाते. संशोधनानुसार बांबू इतर झाडांच्या तुलनेत ३५ टक्यांपर्यंत जास्त ऑक्सिजन उत्सर्जित करतो. कार्बन डाय ऑक्साईडचे शोषण करण्याची क्षमता सुद्धा जास्त असल्यामुळे मानवी आरोग्य आणि पर्यावरण संतुलनासाठी वरदान ठरतो.

बांबू हे एक वृक्षाच्छादित बारमाही गवत आहे. ज्याचे अनेक उपयोग आहेत. हि पृथ्वीवरील सर्वात वेगाने वाढणारी वनस्पती आहे. भारतात १३५ हून अधिक बांबू प्रजाती आहेत. त्यापैकी भारत सरकारने व्यावसायिक लागवडीसाठी १५ बांबू जातींची निवड केली आहे. बांबूपासून २००० हून अधिक उत्पादने तयार केली जातात. घरगुती वापरातील फर्निचर, सजावटीच्या वस्तू, कागद, बांधकाम साहित्य, सायकल, पेन, कप, कुंडी, पाणी बॉटल्स, इकोडायरी, टूथब्रश पासून ते अगदी बांबू फायबर पासून कापड निर्मितीही केली जाते. अशा हजारो वस्तू आज बाजारात उपलब्ध आहेत. या वस्तू टिकाऊ आणि पर्यावरण पूरक आहेत. अगदी इथेनॉल, सीएनजी, कोळसा, बायोचार, रेयॉन, कापडासाठी फायबर आणि बरेच काही तयार करू शकते. हे उद्योग लाखो लोकांना उपजीविकेच्या संधी प्रदान करते. अनेक उद्योजक बांबूवर आधारित उद्योग उभारत आहेत.

Explainer: हिंसक व्हिडिओंचा तरुणांवर कसा होतोय नकारात्मक परिणाम? संशोधनातून धक्कादायक निष्कर्ष समोर

आहारातही उपयोग!
बांबूच्या कोवळ्या कोंबांचा आहारामध्ये वापर होतो. त्यातले योग्य कोलेस्ट्रॉलचे प्रमाण, एंटीऑक्सीडेंट क्षमता, जीवनसत्व, क्षार यांचा आहारातील चांगला स्त्रोत म्हणून वापर केला जातो.
अर्थव्यवस्थेला चालना
ग्रामीण भागात बांबू-आधारित उद्योगामुळे हजारो लोकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. विशेषत: महिला बचतगट आणि लघुउद्योग बांबूपासून विविध वस्तू तयार करून थेट बाजारपेठेत विक्री करत आहेत. या उद्योगामुळे शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळत असून ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी उभारी मिळत आहे.
भारतातील गोंड, भिल्ल, वारली, कोलाम यांसारख्या आदिवासी समाजात बांबू हा दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग आहे. पिढ्यान् पिढ्या चालत आलेल्या परंपरेतून त्यांनी बांबूपासून टोपल्या, चटया, वाद्ये, शेतीची साधने तसेच घरगुती उपयोगाच्या वस्तू तयार करण्याचे कौशल्य आत्मसात केले आहे. ही कला त्यांचा प्रमुख रोजगार व संस्कृतीशी निगडित असून, आज शासन व विविध संस्था या वस्तूंना प्रशिक्षण व बाजारपेठ उपलब्ध करून देत आहेत. त्यामुळे आदिवासी समाजाचे पारंपरिक ज्ञान आधुनिक काळात नवी दिशा घेत आहे.
बांबू क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी भारतातील वेध राज्यांमध्ये ‘बांबू सोसायटी ऑफ इंडिया’ कार्यरत आहे. महाराष्ट्रातील बांबू शेतकरी, उद्योजक, हस्तकला कारागीर आणि बांबू संशोधकांना एकत्र आणून या क्षेत्राचा सर्वांगीण विकास घडवण्याचे काम ते करतात. महाराष्ट्र बांबू विकास मंडळाची ‘अटल बांबू समृद्धी योजना’ ही शेतकऱ्यांना त्यांचे उत्पन्न वाढवण्याकरिता सुरू केलेली योजना आहे. शेती सोबतच अतिरिक्त उत्पन्नात वाढ व्हावी म्हणून या योजनेचा फायदा आणि शेतकऱ्यांना होत आहे. त्यासाठी जिल्हास्तरावर असलेले बांबू समन्वयक शेतकऱ्यांना योजनेबद्दल माहिती सांगण्यापासून लागवडी पर्यंत मदत करतात.
‘ग्रामीण आणि दुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासींसाठी बांबू वस्तू बनवणे हे मुख्य उपजीविकेचे साधन आहे. पिढ्यान् पिढ्या चालत आलेल्या कौशल्यामुळे बांबू कापणे, वाळवणे, आकार देणे आणि वस्तू तयार करण्याचे तंत्र त्यांना नैसर्गिकरित्या अवगत आहे. ऑनलाईन विक्री आणि प्रदर्शनांमुळे त्यांना शाश्वत रोजगाराची संधी मिळत आहे.’

– श्रीकृष्ण परांजपे, ट्राईब छतरी, पुणे

International Equal Pay Day: आंतरराष्ट्रीय समान वेतन दिन महिलांसाठी का आहे खास? जाणून घ्या त्याचा इतिहास आणि महत्त्व

‘बांबू हे एक नगदी पीक आहे. जर योग्य प्रजातिंची निवड, खात्रिची रोपे, योग्य नियोजन व योग्य सल्ला घेतला तर लाखो रुपयांचे उत्पन्न मिळते. याकडे शेती ह्या दृष्टीकोनातून न पहाता उद्योजकता म्हणून कार्य करावे.’
– अजित ठाकूर , माजी संचालक, बांबू सोसायटी ऑफ इंडिया.
‘शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीबरोबरच बांबू शेतीकडे वळले पाहिजे. ही शेती अतिशय कमी खर्चाची आहे. तसेच यातून अतिरिक्त उत्पादनाचा मार्ग मिळतो. या पावसाळ्यात २०२४ – २५ मध्ये अटल बांबू समृद्धी योजनेतून महाराष्ट्रत ६३ लाख बांबू रोपांचे शेतकऱ्यांना वाटप महाराष्ट्र बांबू विकास मंडळामार्फत सुरू आहे. पुणे वनवृत्त मध्ये अटल बांबू समृद्धी योजनेतील ५३ लाभार्थी शेतकऱ्यांना जवळपास ३०००० बांबू रोपांचे वाटप सुरू आहे.’
– विजय सातपुते, बांबू समन्वयक, पुणे वनवृत्त
‘मी स्वतः बुरुड समाजातील असल्यामुळे बुरुड समाजातील पारंपारिक बांबू कारागिरांच्या कलेला आधुनिकतेची जोड मिळावी, त्यांच्या कष्टांचा योग्य मोबदला मिळावा यासाठी विविध माध्यमातून प्रयत्न करत बांबू हस्तकला प्रशिक्षण आणि विविध प्रकारचे प्रबोधनात्मक उपक्रम तसेच शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याचे प्रयत्न करतो आहे. ‘
– सागर पवार, बांबू व्यावसायिक व बांबू हस्तकला प्रशिक्षक, फुरसुंगी, पुणे

Web Title: Oxygen enviornment use business world bamboo day 2025 navarashtra pune special story

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 18, 2025 | 05:25 PM

Topics:  

  • navarashtra special
  • navarashtra special story
  • pune news

संबंधित बातम्या

Pune News : ‘शांतता… पुणेकर वाचत आहेत!’ ९ डिसेंबरला वाचनाच्या उत्सवाला सुरुवात
1

Pune News : ‘शांतता… पुणेकर वाचत आहेत!’ ९ डिसेंबरला वाचनाच्या उत्सवाला सुरुवात

PMRDA चा अनधिकृत आरएमसी प्लँटवर हातोडा; परवानगी घेऊन बांधकाम करावे अन्यथा…
2

PMRDA चा अनधिकृत आरएमसी प्लँटवर हातोडा; परवानगी घेऊन बांधकाम करावे अन्यथा…

वडगावात नगरपंचायत निवडणुकीसाठी मतदारांची मोठी गर्दी; नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण
3

वडगावात नगरपंचायत निवडणुकीसाठी मतदारांची मोठी गर्दी; नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण

“राममंदिर झाले, आता राष्ट्र…”; पुण्यातून RSS सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
4

“राममंदिर झाले, आता राष्ट्र…”; पुण्यातून RSS सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान

ताज्या बातम्या

पुढे वाचा
इस्रायलच्या शत्रूंनी व्हावे सावध! नेतन्याहूंच्या सैन्यात सामील होणार ‘हे’ धोकादायक शस्त्र

इस्रायलच्या शत्रूंनी व्हावे सावध! नेतन्याहूंच्या सैन्यात सामील होणार ‘हे’ धोकादायक शस्त्र

Dec 02, 2025 | 11:25 PM
Maharashtra Politics: “… ते देवाचे अवतार आहेत”; हर्षवर्धन सपकाळांची भाजपवर सडकून टीका

Maharashtra Politics: “… ते देवाचे अवतार आहेत”; हर्षवर्धन सपकाळांची भाजपवर सडकून टीका

Dec 02, 2025 | 09:43 PM
IND vs SA: T20 मालिकेसाठी भारतीय संघाच्या घोषणेचा दिवस ठरला? ‘या’ तीन स्टार खेळाडूंना मिळणार पुन्हा संधी 

IND vs SA: T20 मालिकेसाठी भारतीय संघाच्या घोषणेचा दिवस ठरला? ‘या’ तीन स्टार खेळाडूंना मिळणार पुन्हा संधी 

Dec 02, 2025 | 09:14 PM
Jalna News : भाजपा पोलीस प्रशासनाच्या मदतीने मारहाण करत असल्याचा महाविकास आघाडीचा आरोप

Jalna News : भाजपा पोलीस प्रशासनाच्या मदतीने मारहाण करत असल्याचा महाविकास आघाडीचा आरोप

Dec 02, 2025 | 08:50 PM
राज्यातील 80 टक्के जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी होतील;उमेश पाटील यांचा रोहित पवारांना टोला

राज्यातील 80 टक्के जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी होतील;उमेश पाटील यांचा रोहित पवारांना टोला

Dec 02, 2025 | 08:45 PM
Local Body Election :”मी नाराज एकच बाबतीत आहे की मला फॉर्म भरायला मिळाला नाही”- उदयन राजे भोसले

Local Body Election :”मी नाराज एकच बाबतीत आहे की मला फॉर्म भरायला मिळाला नाही”- उदयन राजे भोसले

Dec 02, 2025 | 08:37 PM
ज्येष्ठ नागरिकांसाठी 10 दिवसीय मूल्यवर्धित अभ्यासक्रम! जोशी बेडेकर महाविद्यालयाचा अनोखा उपक्रम

ज्येष्ठ नागरिकांसाठी 10 दिवसीय मूल्यवर्धित अभ्यासक्रम! जोशी बेडेकर महाविद्यालयाचा अनोखा उपक्रम

Dec 02, 2025 | 08:29 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Vaibhav Naik : “हिंमत असेल तर राजीनामा देऊन पुन्हा लढा”; वैभव नाईकांचे निलेश राणेंना आव्हान

Vaibhav Naik : “हिंमत असेल तर राजीनामा देऊन पुन्हा लढा”; वैभव नाईकांचे निलेश राणेंना आव्हान

Dec 02, 2025 | 08:29 PM
Jalna : मतदान केंद्रावर पोलीस उपनिरिक्षकाला उमेदवाराने केली मारहाण? नेमकं प्रकरण काय ?

Jalna : मतदान केंद्रावर पोलीस उपनिरिक्षकाला उमेदवाराने केली मारहाण? नेमकं प्रकरण काय ?

Dec 02, 2025 | 08:24 PM
Local Body Elections : परभणी जिल्ह्यातल्या सात नगरपालिकांसाठी उद्या मतदान, कसा राहिला प्रचार ?

Local Body Elections : परभणी जिल्ह्यातल्या सात नगरपालिकांसाठी उद्या मतदान, कसा राहिला प्रचार ?

Dec 01, 2025 | 08:14 PM
Ambernath : रविंद्र चव्हाणांना पराभवाची भीती म्हणून निवडणूक ढकलल्या, शिंदे गटाचा आरोप!

Ambernath : रविंद्र चव्हाणांना पराभवाची भीती म्हणून निवडणूक ढकलल्या, शिंदे गटाचा आरोप!

Dec 01, 2025 | 08:01 PM
Palghar Politics : शिंदे गट नागरिकांसाठी काय काय करणार ? उमेदवार उत्तम घरत यांचा सवाल

Palghar Politics : शिंदे गट नागरिकांसाठी काय काय करणार ? उमेदवार उत्तम घरत यांचा सवाल

Dec 01, 2025 | 06:46 PM
Solapur News : फडणवीसांच्या हातात काठी येईपर्यंत सत्ता भाजपचीच-राजेंद्र राऊत

Solapur News : फडणवीसांच्या हातात काठी येईपर्यंत सत्ता भाजपचीच-राजेंद्र राऊत

Dec 01, 2025 | 06:31 PM
Chh.Sambhajinagar :  मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या पैठणमधील सभेवर सर्वसामान्यांचे मत काय ?

Chh.Sambhajinagar : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या पैठणमधील सभेवर सर्वसामान्यांचे मत काय ?

Dec 01, 2025 | 06:21 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.