फोटो सौजन्य - Social Media
सध्या भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. पाकिस्तान भारतावर अनेक हल्ले करत आहे पण त्यांचे हे प्रत्यत्न त्यांच्या कामी येत नाही आहेत. कारण पाकिस्तानने केलेल्या प्रत्येक वाराला भारत सडेतोड उत्तर देत आहेत. पाकिस्तानचे हत्यार त्यांच्या काहीच कामी येत नाही आहेत, कारण त्यांनी भारतावर हल्ला केला असता भारतीय सैन्य अगदी हवेतच त्या हत्यारांना धुळीत मिळवत आहेत. अशा प्रकारे आधीच काही नसलेला देश पाकिस्तान, जे काही आहे ते ही गमावण्यात कोणतीही कसर सोडत नाही आहे. पण तुम्हाला ऐकून आश्चर्य बसेल की पाकिस्तानचे राष्ट्रपिता मोहम्मद अली जिन्ना यांचे पूर्वज हिंदू होते. चला तर मग या विषयी जाणून घेऊयात.
२२ एप्रिल रोजी पाकिस्तानाने पहलगाम येथे केलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही देशात तणावाचे वातावरण आहे. धर्माच्या नावाने केलेल्या या हल्ल्याविषयी संपूर्ण जगाला माहित झाले आहे. पण ज्या देशातील दहशतवाद्यांनी धर्माच्या नावाने २६ भारतीय नागरिकांची हत्या केली आहे, त्यांचा राष्ट्रपित्याचे पूर्वज स्वतः कधीकाळी हिंदू होते.
फाळणीच्या वेळी इस्लाम धर्मीयांसाठी स्वतंत्र राष्ट्राची मागणी मोहम्मद अली जिन्ना यांनी केली. तेव्हा हिंद प्रांताचे दोन तुकडे पडले. पण ही मागणी करणारा मोहम्मद अली जिन्ना यांचे पूर्वज स्वतः हिंदू होते. त्यांच्या वडिलांचे नाव जेनाभाई प्रेमजीभाई ठक्कर. प्रेमजीभाई मच्छीविक्रेता होते. परंतु, ते लोहाणा समाजातून असल्यामुळे त्यांच्या समाजात मांसाहाराला बंदी होती. त्यांना व्यवसायात अनेक गोष्टींना सामोरे जावे लागले. विशेष म्हणजे या व्यवसायातून ते उत्तम नफा कमवत होते.
एकेदिवशी प्रेमजीभाई यांचा मुलगा पुंजालाल याने त्याच्या कुटुंबासहित धर्मातंरण केले आणि गुजरातच्या काठियावाड येथून कराची येथे राहायला गेले. तेथे व्यवसाय उभारून ते यशस्वी झाले. मुस्लिम धर्म स्वीकारल्यानंतर जिन्नांनी आपली मुलगीही मुस्लिम धर्मात वाढवली आणि धर्माच्या आधारावर पाकिस्तानची स्थापना केली. जिन्ना यांनी पारसी धर्माच्या मुलीशी लग्न केले होते, जे त्यांच्या वैयक्तिक जीवनात एका वेगळ्या परंपरेचे चित्र दाखवते.