कुकरमध्ये १० मिनिटांमध्ये बनवा चटकदार आंबटगोड कैरीचे लोणचं! पदार्थ पाहून तोंडाला सुटेल पाणी
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये प्रत्येक घरात लोणच, वाळवणाचे पदार्थ, कुरडया, पापड इत्यादी अनेक पदार्थ बनवले जातात. या दिवसांमध्ये वर्षभर पुरतील असे पदार्थ बनवले जातात. याशिवाय उन्हाळ्यात कच्च्या कैरीपासून आवर्जून बनवला जाणारा पदार्थ म्हणजे कच्च्या कैरीचे लोणचं. लोणचं पाहिल्यानंतर अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटते. जेवणात कैरीची लोणचं असेल तर दोन घास जेवण जास्त जात. बऱ्याचदा बाजारातून विकत आणलेले लोणचं एक किंवा दोन महिन्यानंतर लगेच खराब होऊन जाते. लोणच्यामधील तेल खराब होणे, लोणच्याला बुरशी येणे इत्यादीमुळे लोणचं खराब होऊन जाते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला कुकरचा वापर करून १० मिनिटांमध्ये चटपटीत मसालेदार कच्च्या कैरीचे लोणचं बनवण्याची सोपी कृती सांगणार आहोत. बऱ्याचदा लोणचं मुरण्यासाठी ३ ते ४ दिवसांचं वेळ लागतो. पण कुकरमध्ये लोणचं झटपट तयार होते.(फोटो सौजन्य – iStock)
Alu Vadi Recipe: महाराष्ट्रीयन स्टाईल पारंपरिक अळूवडी रेसिपी; जेवणाची चव होईल द्विगुणित