सावरकर आणि महात्मा गांधी यांनी एकत्रित प्रयत्नाने लंडनमध्ये पहिल्यांदा दसरा साजरा केला (फोटो - टीम नवराष्ट्र)
भारतीय संस्कृतीचा प्रभाव वाढण्यासाठी आणि ख्रिश्चन सणांचा प्रभाव कमी करण्यासाठी वीर सावरकर आणि महात्मा गांधी यांच्या एकत्रित प्रयत्नांनी लंडनमध्ये पहिल्यांदाच दसरा साजरा करण्यात आला. 1909 मध्ये आजच्या दिवशी सावरकर यांनी क्कीन्सरोड डॉल येथे दसरा सोहळ्याचे आयोजन केले. यामध्ये ब्रिटीश विद्यार्थ्यांना येण्यास मज्जाव घालण्यात आला. या सोहळ्यासाठी 100 हून अधिक परदेशामध्ये राहणारे भारतीय लोक जमले होते. हॉलमध्ये भारतीय पद्धतीने जेवणाच्या पंक्ती बसवण्यात आल्या होत्या. धुपाचा दरवळ सगळीकडे पसरला होता. मध्यभागी ध्वज उभारण्यात आला होता. त्यावर ठळक अक्षरात वंदे मातरम असे लिहिण्यात आले होते. राष्ट्रगीताच्या स्वराने कार्यक्रमाला वेगळीच शोभा आणली होती. दक्षिण आफ्रिकेतून महात्मा गांधी खास या कार्यक्रमासाठी लंडनला आले होते. अली अझीझ हे आफ्रिकेतील त्यांचे सहकारी सोबत होते.
24 ऑक्टोबर रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
24 ऑक्टोबर रोजी जन्म दिनविशेष
नवराष्ट्र विशेष लेख वाचण्यासाठी क्लिक करा
24 ऑक्टोबर रोजी मृत्यू दिनविशेष






