world soil day 2025 : जागतिक माती दिनानिमित्त तिचे संरक्षण करण्याचे मार्ग जाणून घ्या. ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
आजची माती पूर्वीसारखी सुपीक राहिलेली नाही. रासायनिक पदार्थांमुळे तिच्यातील आवश्यक पोषक घटक नष्ट होत चालले आहेत. एका काळी पिकांना उत्तम उत्पादन देणारी जमीन आता बंजर होण्याच्या मार्गावर आहे. जिथे प्रति हेक्टर ४०० किलो नायट्रोजन असणे अपेक्षित होते, तिथे काही भागांत ते प्रमाण जवळपास शून्यापर्यंत गेले आहे. या परिस्थितीत शेतकऱ्यांसमोरील अडचणी वाढत असून, अन्नसुरक्षेवर मोठा प्रश्नचिन्ह उभा राहिला आहे. जर हीच स्थिती राहिली, तर भविष्यात पिकांचे उत्पादन प्रचंड घटेल आणि अन्नटंचाईचा धोका अधिक गडद होईल.
5 Dec is World Soil Day.
A good moment to honor the unseen life beneath us… the life that makes our life possible.#WorldSoilDay #SaveSoil pic.twitter.com/ummZqvr7aT — Conscious Planet #SaveSoil (@cpsavesoil) December 4, 2025
credit : social media and Twitter
मातीचे रक्षण केवळ सरकार किंवा संस्था करू शकत नाहीत, तर प्रत्येक नागरिकाची ही जबाबदारी आहे. दररोज आपल्या जीवनशैलीत छोटे बदल करून आपण मोठे परिणाम साधू शकतो. प्लास्टिकचा वापर कमी करणे, ओला कचरा आणि सुका कचरा वेगवेगळा ठेवणे, सेंद्रिय खतांचा वापर वाढवणे, झाडे लावणे आणि त्यांचे संगोपन करणे अशा साध्या सवयी मातीच्या आरोग्यास मोठे बळ देऊ शकतात. याचसोबत, वृक्षतोड रोखणे आणि जलसंधारणावर भर देणेही आवश्यक आहे, कारण झाडे आणि माती यांचे नाते अतूट आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Ban Munir: पाकिस्तानच्या सत्ताकाठावर पडझड सुरूच! असीम मुनीर प्रकरणात अमेरिकाही सहभागी; 49 कायदेकर्त्यांनी केली ‘ही’ मागणी
जागतिक स्तरावरही मृदासंवर्धनासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या पुढाकाराने २०३० पर्यंत एक अब्ज हेक्टर खराब झालेली जमीन पुनर्संचयित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. भारतही या मोहिमेत आघाडीवर असून सुमारे २६ दशलक्ष हेक्टर जमीन पुनर्संचयित करण्यासाठी प्रयत्न करत आहे. मातीचे संरक्षण करणाऱ्या योग्य भू-वापर पद्धती केवळ शेतीचेच नव्हे, तर दुष्काळ, पूर, वणवे, वाळू वादळे आणि धूळ प्रदूषण यांसारख्या नैसर्गिक आपत्तींविरोधातही संरक्षणकवच निर्माण करू शकतात.
Happy World Soil Day!
Let’s protect the foundation of life beneath our feet — healthy soil, healthy future 🌱🌍 pic.twitter.com/NBjc7jfu3C — Directorate of Horticulture & Soil Conservation (@horti_tripura) December 5, 2025
credit : social media and Twitter
जागतिक मृदा दिनाच्या निमित्ताने शाळा, महाविद्यालये, शेतकरी समुदाय आणि स्थानिक संस्था विविध जागरूकता मोहिमा, माती परीक्षण शिबिरे, वृक्षारोपण कार्यक्रम आणि कृषी मार्गदर्शन उपक्रम राबवत आहेत. सोशल मीडिया आणि डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातूनही लोकांपर्यंत मातीचे महत्त्व पोहोचवले जात आहे. मात्र, केवळ एका दिवसापुरते मर्यादित न राहता वर्षभर मातीचे संवर्धन करणे हीच खरी गरज आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : War Update : बलुचिस्तान की खैबर पख्तूनख्वा…कोण आधी मुक्त होणार? पाकिस्तानवरून मोठी बातमी; मुनीरचे कंबरडे मोडणार
शेवटी इतकेच म्हणावे लागेल की, मातीचे रक्षण म्हणजेच जीवनाचे रक्षण आहे. जर आपण आज माती वाचवण्याचा निर्धार केला नाही, तर उद्या आपल्याला तिचा अभाव तीव्रपणे जाणवेल. म्हणूनच जागतिक मृदा दिन हा केवळ एक दिवस नसून, तो आपल्या जबाबदारीची जाणीव करून देणारा एक संकल्प आहे, जो प्रत्येकाने पाळणे आवश्यक आहे.
Ans: 5 डिसेंबर रोजी.
Ans: रसायने, प्रदूषण आणि जंगलतोडमुळे.
Ans: वृक्षारोपण आणि सेंद्रिय शेती.






