सिडनी येथे सुरु असलेल्या भारत विरुद्ध नेदरलँड यांच्यात सुरु असलेल्या टी २० सामन्यात भारतीय संघाने नेदरलँड संघासमोर १८० धावांचा आव्हान ठेवलं आहे. टी २० विश्वचषकातील दुसऱ्या सामन्यात भारताने नेदरलँड विरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता.
भारतीय संघातील कर्णधार रोहित शर्मा आणि फलंदाज के एल राहुल हे दोघे सलामीफलंदाज सुरुवातीला मैदानात उतरले. मात्र १२ चेंडूत अवघ्या ९ धावा करत के एल राहुल स्वस्तात माघारी परतला. तर कर्णधार रोहित शर्मा ३९ चेंडूत ५३ धावा करून झेल बाद झाला. यानंतर भारतीय संघाची कमान सूर्यकुमार यादव आणि विराट कोहलीने सांभाळली. विराट कोहलीने अर्धशतक झळकावत नाबाद ६२ धाव केल्या.
सूर्यकुमार यादव याने २५ चेंडूत ५१ धावांची अर्धशतकी खेळी केली. विराट आणि सूर्याने तिसऱ्या विकेटसाठी ४८ चेंडूत नाबाद ९५ धावांची भागीदारी रचली. नेदरलँड विरुद्धच्या सामन्यात तीन भारतीय फलकंदाजांनी अर्धशतकी खेळी केली. भारताने टी २० विश्वचषक २०२२ च्या सुपर १२ मधील आपल्या दुसऱ्या सामन्यात नेदरलँडविरूद्ध २० षटकात २ बाद १७९ धावा केल्या.