कोल्हापूर : कतारमध्ये सुरू असणाऱ्या फुटबॉल विश्वचषकाची क्रेझ ही कोल्हापुरातही पहायला मिळाली. अर्जेंटिना विरुद्ध फ्रान्स संघांदरम्यानचा अंतिम सामना केवळ पाहण्यासाठीच नाही, तर त्याचा अनुभवण्यासाठी देखील कोल्हापूर शहरात विविध ठिकाणी मोठमोठ्या स्क्रीन उभारण्यात आल्या होत्या. अंतिम सामन्यात मेस्सीने अर्जेंटिना संघाला विजयी आघाडी मिळवून दिली. शूटआऊट राऊंडमध्ये अर्जेंटिना संघाने विजयी गोल करताच कोल्हापुरात उत्साहाचा महापूर आला.
Football Crazy Kolhapur. Messi Fans Are Simply Uncontrollable. Cherish The Moment.
Courtesy: Unknown Kolhapurkar. pic.twitter.com/K6KvmQyxge— Abhijeet Patil (@abhijeetpTOI) December 18, 2022
Kolhapur on fire ??? pic.twitter.com/dpkBiT5c3x
— Gorakh Pathave (@pathave_gorakh) December 19, 2022
विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होण्याआधीपासूनच शहरभरामध्ये फुटबॉलचे रंग पसरू लागले होते. चौकाचौकात, गल्लीबोळातून देखील आवडत्या संघासह खेळाडूंचे भले मोठे बॅनर आणि पोस्टर लावण्यात आले होते. स्पर्धा पुढे जाईल तशी चुरस वाढली. अखेर विश्वविजेता ठरण्याचा दिवस आल्याने फुटबॉल प्रेमींनी सामन्याचे साक्षीदार होण्यासाठी स्क्रीन उभारल्या, बैठक व्यवस्था केली, साउंड सिस्टमने माहोल तयार केला. अंतिम सामना पाहण्यासाठी संपूर्ण कोल्हापूर सजल होत. अर्जेंटिनाने सामना जिंकल्यानंतर कोल्हापुरात एकाच जल्लोष करण्यात आला त्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.