फोटो सौजन्य - X सोशल मीडिया
अभिषेक नायर : भारताच्या संघाने T२० विश्वचषक जिंकला आणि लगेच ९ महिन्यांनंतर टीम इंडियाने चॅम्पियन ट्रॉफी नावावर केली. २०२४ चा T२० विश्वचषक भारताच्या संघाने राहुल द्रविड यांच्या कोचिंगमध्ये नावावर केला होता. त्यानंतर त्यांनी भारतीय संघामधून निवृत्तीची घोषणा केली आणि गौतम गंभीरला भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणून नेमण्यात आले होते. या स्टाफ टीममध्ये बॅटिंग कोच म्हणून अभिषेक नायर याला ठेवण्यात आले होते पण आता त्याचा करार रद्द करण्यात आला आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने अभिषेक नायर यांना फलंदाजी प्रशिक्षक पदावरून काढून टाकले. आयपीएल २०२४ पासून त्यांना टीम इंडियाचे फलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले. पण इंडियन प्रीमियर लीग २०२५ दरम्यानच बीसीसीआयने त्याचा करार रद्द केला अशी माहिती समोर आली आहे. आता अशी बातमी आहे की टीम इंडियामधून वगळल्यानंतर तो आयपीएल २०२५ मध्ये दिसू शकतो. तो आयपीएल २०२५ मध्ये एखाद्या संघात सामील होऊ शकतो.
KKR’s top priority should be restarting the KKR Academy with Abhishek Nayar.
Let’s return to backing young talent. Yes, we lost some players in the auction but we also gained immensely from the academy. pic.twitter.com/FBxYeqCags
— KKR Karavan (@KkrKaravan) April 17, 2025
क्रिकबझच्या मते, भारतीय फलंदाजी प्रशिक्षकपदावरून काढून टाकल्यानंतर अभिषेक नायर कोलकाता नाईट रायडर्समध्ये सामील होऊ शकतो. केकेआरसाठी अभिषेक नायरला महत्त्वाच्या भूमिकेत पाहिले गेले आहे. अनेक वर्षे फलंदाजी प्रशिक्षक असण्यासोबतच, त्यांनी केकेआर फ्रँचायझीसाठी अकादमीचे व्यवस्थापन करण्याची जबाबदारीही सांभाळली आहे. नायर आयपीएल २०२४ मध्ये केकेआरचे फलंदाजी प्रशिक्षक होते. त्यांच्या प्रशिक्षणाखाली संघाने उत्कृष्ट कामगिरी केली आणि चॅम्पियनही झाला. आता असे मानले जात आहे की तो आयपीएल २०२५ मध्ये कोलकाता नाईट रायडर्समध्ये सामील होऊ शकतो.
अभिषेकला प्रशिक्षणाचा भरपूर अनुभव आहे. त्यांनी सध्याच्या भारतीय संघातील अनेक स्टार खेळाडूंना वैयक्तिक प्रशिक्षणही दिले आहे. त्याने रोहित शर्माला वैयक्तिक प्रशिक्षणही दिले आहे.
इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी बीसीसीआयने फलंदाजी प्रशिक्षक अभिषेक नायर, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी दिलीप आणि फिटनेस प्रशिक्षक सोहम देसाई यांचे करार रद्द केले आहेत. अशा परिस्थितीत, नायरकडे आता फ्रँचायझी क्रिकेटमध्ये सामील होण्याची सुवर्णसंधी आहे. गतविजेत्या केकेआरची आयपीएल २०२५ मध्ये चांगली कामगिरी झालेली नाही. आतापर्यंत कोलकाता नाईट राइडर्सने खेळलेल्या ७ सामन्यांमध्ये संघाने ३ सामने जिंकले आहेत, तर ४ सामन्यांमध्ये त्यांना निराशाजनक कामगिरीमुळे पराभवाचा सामना करावा लागला आहे. पॉइंट्स टेबलमध्ये केकेआर सहाव्या स्थानावर आहे.