फोटो सौजन्य - X सोशल मीडिया
अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया : उद्या दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये सामना रंगणार आहे. पण आज सेमीफायनलच्या लढतीसाठी अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये महत्वाचा सामना रंगणार आहे. त्यामुळे अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये सामन्याची मजा चाहत्यांना घेता येणार की सामना पावसाने वाहून जाणार यासंदर्भात आम्ही तुम्हाला आज सांगणार आहोत. चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या १० व्या सामन्यात अफगाणिस्तान क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियाचा सामना करेल.
WPL 2025 : डिफेन्डिंग चॅम्पियनची पॉइंट्स टेबलमध्ये वाईट स्थिती, या संघाने मारली पहिल्या स्थानावर उडी
या सामन्याचे आयोजन लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर ग्रुप-ब संघांमध्ये खेळवला जाणार आहे. मागील दोन दिवसांपासून रावळपिंडीमधील सामने पावसामुळे रद्द झाले आहेत. त्यामुळे स्पर्धेवर याचा मोठा परिणाम झाला आहे. अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलिया सामन्यापूर्वी, गद्दाफी स्टेडियमच्या खेळपट्टीची स्थिती काय असेल आणि लाहोरचे हवामान कसे असेल ते जाणून घेऊया?
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या सामन्यात, ऑस्ट्रेलियन संघाने सुरुवातीच्या सामन्यात इंग्लंडचा पराभव केला. कांगारू संघाने ३५२ धावांचे लक्ष्य गाठले, तर संघाचा दुसरा सामना, जो दक्षिण आफ्रिकेसोबत रावळपिंडी येथे खेळला जाणार होता, तो पावसामुळे वाया गेला. दुसरीकडे, पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून १०७ धावांनी पराभव पत्करल्यानंतर, अफगाणिस्तानने दुसऱ्या सामन्यात पुनरागमन केले आणि इंग्लंडला ८ धावांनी पराभूत केले. आता दोन्ही संघ (ऑस्ट्रेलिया विरुद्ध अफगाणिस्तान) २८ फेब्रुवारी रोजी एकमेकांसमोर येणार आहेत. या सामन्यात जो संघ जिंकेल तो उपांत्य फेरीत प्रवेश करेल आणि जो संघ पराभूत होईल तो स्पर्धेतून बाहेर पडेल.
जर ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानमधील सामना अनिर्णित राहिला, तर कांगारू संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरेल, तर अफगाणिस्तान संघ दक्षिण आफ्रिका-इंग्लंड सामन्याच्या निकालावर अवलंबून असेल.
लाहोरमधील गद्दाफी स्टेडियमची खेळपट्टी सामान्यतः फलंदाजांसाठी अनुकूल राहिली आहे. या मैदानावर उच्च धावसंख्या असलेले सामने पाहिले जातात. सामन्यात फलंदाज भरपूर धावांचा पाऊस पाडताना दिसतात. सामन्यात जो संघ नाणेफेक जिंकतो तो प्रथम फलंदाजी करण्यास प्राधान्य देतो.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध अफगाणिस्तान सामन्यादरम्यान लाहोरमधील हवामान खराब असण्याची शक्यता आहे. सकाळी ६ ते दुपारी ३ वाजेपर्यंत पावसाची शक्यता ४० ते ७० टक्के राहील. जर पावसामुळे किंवा ओल्या मैदानामुळे सामना उशिरा सुरू झाला किंवा सामना वाया गेला तर ऑस्ट्रेलिया थेट उपांत्य फेरीसाठी पात्र ठरेल तर अफगाणिस्तानला दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांच्यातील सामन्याच्या निकालाची वाट पहावी लागेल.
एकूण सामने- ४१
प्रथम फलंदाजी करताना जिंकलेले सामने – ४
नंतर फलंदाजी करताना जिंकलेले सामने – १५
पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या – ३२२
दुसऱ्या डावातील सरासरी धावसंख्या – ३३९