भारताचा फिरकी गोलंदाज आर अश्विनने काही दिवसापूर्वीच त्याने त्याचे 500 विकेट्स पूर्ण केले. 500 विकेट पूर्ण केल्यावर त्याच्यावर सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांकडून आणि दिग्गज खेळाडूंकडून कौतुकाचा वर्षाव झाला. आज रविचंद्रन अश्विन आणि इंग्लंडचा यष्टिरक्षक फलंदाज जॉनी बेअरस्टो त्यांच्या कसोटी कारकिर्दीतील 100 वा सामना खेळत आहेत. टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी धरमशाला कसोटीपूर्वी अश्विनला खास कॅप दिली. यावेळी अश्विनचे कुटुंबही मैदानात होते. भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने अश्विन आणि बेअरस्टोचा मान वाढवला. या दोन खेळाडूंसाठी त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.
सचिनने अश्विन आणि बेअरस्टोचा फोटो X वर शेअर केला आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, धर्मशाळेतील हा ऐतिहासिक दिवस आहे. अश्विन आणि बेअरस्टो त्यांचा 100 वा कसोटी सामना खेळत आहेत. त्याच्यासाठी एक अतुलनीय कामगिरी जी कसोटी क्रिकेटबद्दलची त्याची आवड आणि दृढनिश्चय दर्शवते. मी दोघांनाही भविष्यासाठी शुभेच्छा देतो!” सचिनच्या सोशल मीडिया पोस्टवर चाहत्यांनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत. अश्विन आणि बेअरस्टो यांना शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
It’s a historic day in Dharamsala as @ashwinravi99 and @jbairstow21 don the international whites for the 100th time. An incredible achievement that speaks volumes about their passion and perseverance for red-ball cricket. I wish them both a fantastic game ahead!#INDvENG pic.twitter.com/XTvzApvHEI — Sachin Tendulkar (@sachin_rt) March 7, 2024
अश्विनची आतापर्यंतची कसोटी कारकीर्द
अश्विनची कसोटी कारकीर्द आतापर्यंत उत्कृष्ट राहिली आहे. त्याने 187 डावात 507 विकेट्स घेतल्या आहेत. या कालावधीत त्याने 35 वेळा पाच किंवा त्याहून अधिक बळी घेण्याचा पराक्रम केला आहे. एका डावातील त्याची सर्वोत्तम कामगिरी म्हणजे 59 धावांत 7 बळी. अश्विनने फलंदाजीतही हात आजमावला आहे. त्याने 140 कसोटी डावात 3309 धावा केल्या आहेत. या कालावधीत त्याने 5 शतके आणि 14 अर्धशतके केली आहेत. अश्विनची कसोटी सर्वोत्तम धावसंख्या 124 धावा आहे.
इंग्लंडचा यष्टिरक्षक फलंदाज जॉनी बेअरस्टोने कसोटी सामन्यांमध्ये अनेक वेळा चमत्कार दाखवले आहेत. त्याने 176 डावात 5974 धावा केल्या आहेत. या कालावधीत त्याने 12 शतके आणि 26 अर्धशतके केली आहेत. बेअरस्टोची सर्वोत्तम कसोटी धावसंख्या म्हणजे नाबाद 167 धावा. या फॉरमॅटमध्ये त्याने 14 स्टंपिंग केले आहेत. तसेच 242 झेल घेतले.