भारत आणि इंग्लंड यांच्यात हैदराबाद येथे कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळला जात आहे. रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन या जोडीने एक खास विक्रम आपल्या नावावर केला आहे. अश्विन-जडेजा भारतासाठी सर्वाधिक कसोटी बळी घेणारे जोडीदार ठरले आहेत. या दोघांनीही अनिल कुंबळे आणि हरभजन सिंगला मागे टाकले आहे. हैदराबाद कसोटीत इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियाची पहिली विकेट अश्विनने मिळवली.
जडेजा-अश्विन अव्वल स्थानावर
खरं तर, भारतासाठी कसोटीत सर्वाधिक विकेट्स घेणारी जोडी म्हणजे कुंबळे आणि हरभजन. या दोघांनी 501 विकेट घेतल्या आहेत. या बाबतीत झहीर आणि हरभजनची जोडी दुसऱ्या क्रमांकावर आहे. या दोघांनी कसोटीत 474 विकेट घेतल्या आहेत. मात्र आता हा क्रम बदलला आहे. अश्विन आणि जडेजा ही जोडी अव्वल स्थानावर पोहोचली आहे. वृत्त लिहिपर्यंत दोघांनी 502 विकेट घेतल्या आहेत. कुंबळे-भज्जी दुसऱ्या क्रमांकावर आले आहेत. तर भज्जी आणि झहीर तिसऱ्या क्रमांकावर आले आहेत. या दोघांनी 474 विकेट घेतल्या आहेत.
वृत्त लिहिपर्यंत जडेजाने टीम इंडियासाठी 129 कसोटी डावात 276 विकेट घेतल्या आहेत. या काळात त्याने 12 वेळा पाच किंवा त्याहून अधिक विकेट घेतल्या आहेत. अश्विनने टीम इंडियासाठी 180 डावात 492 विकेट घेतल्या आहेत. तो 500 कसोटी बळी घेण्याच्या जवळ पोहोचला आहे. पण अजून 8 विकेट्स हव्या आहेत.
उल्लेखनीय आहे की, भारताविरुद्धच्या हैदराबाद कसोटीत इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यादरम्यान पहिल्या दिवशी लंच ब्रेकपर्यंत संघाने 3 गडी गमावून 108 धावा केल्या. भारताची पहिली विकेट अश्विनला मिळाली. त्याने बेन डकेटला बाद केले. लंच ब्रेकपर्यंत अश्विनने 8 षटकांत 20 धावा देत 2 बळी घेतले. रवींद्र जडेजाने 8 षटकात 34 धावा देत 1 बळी घेतला.