हार्दिक पांड्या(फोटो-सोशल मीडिया)
Hardik Pandya to create history : ९ सप्टेंबरपासूनआशिया कप २०२५ चा थरार रांगणार आहे. आशिया कप २०२५ मध्ये भारताचा स्टार अष्टपैलू हार्दिक पंड्या आपली जादू दाखवण्यासाठी सज्ज होता आहे. अद्याप आसिआय कप २०२५ साठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आलेली नाही. तरी हार्दिक पंड्या या संघाचा भाग असणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे. आशिया कपला आता एक महिन्यापेक्षा कमी वेळ शिल्लक आहे. या स्पर्धेत भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पंड्या आपल्या नावावर एक मोठा विक्रम करण्याची नामी संधी असणार आहे.
९ ते २८ सप्टेंबर दरम्यान दुबई आणि अबू धाबी येथे आशिया कप २०२५ स्पर्धा खेळवला वाजणार आहे. या स्पर्धेत हार्दिक पंड्या भारतीय संघासाठी एक महत्त्वाचा खेळाडू असणार आहे. हार्दिक पंड्याला या स्पर्धेत इतिहास रचण्याची संधी असेल. जर पंड्या या स्पर्धेत ६ विकेट घेण्यात यशस्वी ठरला तर तो या टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १००० धावा करणारा आणि १०० विकेट घेणारा जगातील दुसरा आणि भारताचा पहिलाच खेळाडू बनणार आहे.
हार्दिक पंड्याने जानेवारी २०१६ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध पदार्पण केले आहे. तेव्हापासून त्याने आतापर्यंत ११४ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळलेले आहेत. आतापर्यंत पंड्याने टी-२० सामन्यात १८१२ धावा आणि ९४ विकेट काढल्या आहेत. अष्टपैलु हार्दिक पंड्या हा भारताचा सर्वाधिक विकेट घेणारा तिसरा आणि आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यांमध्ये पाचवा सर्वाधिक धावा करणारा गोलंदाज आहे.
विकेटच्या बाबतीत सांगायचे झाल्यास हार्दिक पंड्या हा अर्शदीप सिंग आणि युजवेंद्र चहल यांच्या मागे आहे. अर्शदीप सिंगने आता ६३ टी-२० सामन्यांमध्ये ९९ विकेट घेतल्या आहेत. त्याच वेळी, युजवेंद्र चहलच्या नावावर ९६ विकेट जमा आहेत. जर हार्दिक पंड्याने ६ विकेट्स घेतल्या तर तो या दोघांना मागे टाकू शकेल.
हेही वाचा : SA vs AUS : टिम डेव्हिडने मोडला मिस्टर ३६० चा विश्वविक्रम! टी-२० मध्ये पहिल्यांदाच केला ‘हा’ पराक्रम
टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासामध्ये आतापर्यंत फक्त बांगलादेशचा माजी कर्णधार शाकिब अल हसनच हे करू शकला आहे. शाकिब अल हसनने आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यांमध्ये १००० पेक्षा जास्त धावा करण्यात आणि १०० पेक्षा जास्त विकेट घेण्याची किमया साधली आहे. पांड्याव्यतिरिक्त, अफगाणिस्तानच्या मोहम्मद नबीला देखील १००० धावा गाठण्याची आणि आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यांमध्ये १०० विकेट घेण्याची संधी असणार आहे. नबीने आतापर्यंत अफगाणिस्तानकडून खेळताना १३२ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत आणि त्याने ९७ बळी टिपले असून २२३७ धावा देखील केल्या आहेत.