रशीद खान आणि हार्दिक पंड्या (फोटो-सोशल मीडिया)
Asia Cup 2025 : भारत आणि इंग्लंड यांच्यात नुकतीच ५ सामन्यांची कसोटी मालिका संपली. आता ९ सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या आशिया कप २०२५ कडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आशिया कप २०२५ मध्ये भारताचा स्टार अष्टपैलू हार्दिक पंड्या आणि रशीद खान यांच्यात थेट आमनासामना होणार आहे. यांच्यामध्ये एक स्पर्धा रंगणार आहे. आशिया कपसाठी भारतीय संघ असो वा अफगाणिस्तान संघ, या दोन संघाची अद्याप संघ निवड झालेली नाही. परंतु हे दोघे संघात जवळजवळ निश्चित असणार आहेत. अशा परिस्थितीत, हार्दिक पंड्या आणि रशीद खान यांच्यात एक मनोरंजक लढाई देखील पाहायला मिळणार आहे.
आशिया कप २०२५ हा टी२० स्वरूपात खेळवण्यात येणार आहे. हार्दिक पंड्या आणि रशीद खान हे एक विक्रम मोडण्याच्या शर्यतीत आहेत. हा विक्रम आशिया कपच्या टी२० स्वरूपाशी संबंधित आहे. तो विक्रम टी२० आशिया कपमध्ये सर्वाधिक बळी टिपण्याचा आहे. सध्या, रशीद खान आणि हार्दिक पंड्या दोघेही या स्पर्धेत बरोबरीने आहेत. परंतु टी२० आशिया कपमध्ये सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज बनण्याची या दोघांना नामी संधी असणार आहे.
हेही वाचा : SA vs AUS : टिम डेव्हिडने मोडला मिस्टर ३६० चा विश्वविक्रम! टी-२० मध्ये पहिल्यांदाच केला ‘हा’ पराक्रम
टी-२० आशिया कपमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम सध्या भारताच्या दिग्गज गोलंदाज भुवनेश्वर कुमारच्या खात्यावर जमा आहे. त्याने ६ सामन्यात १३ विकेट्स घेण्याची किमया केली आहे. त्याच्यानंतर युएईचा अमजद जावेद १२ विकेट् घेऊन दुसऱ्या स्थानावर विराजमान आहे. पण निवृत्त झालेला अमजद भुवीचा विक्रम मोडण्याच्या शर्यतीतून बाहेर गेला आहे. युएईचा मोहम्मद नवीदही ७ सामन्यात ११ विकेट्स घेतल्या असून तो देखील विक्रम मोडण्याच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे.
हेही वाचा : ‘तेव्हा तर आमचा जन्मही…’ मोहम्मद सिराज माजी दिग्गजाबाबत काय बोलून गेला? वाचा सविस्तर
भारताचा हार्दिक पंड्या आणि अफगानिस्तान चहा रशीद खान यांच्यात थेट स्पर्धा असणार आहे. टी-२० आशिया कपमध्ये ८-८ सामने खेळल्यानंतर दोघांच्याही खात्यात ११-११ विकेट्स जमा आहेत. म्हणजेच, भुवनेश्वर कुमारचा विक्रम मोडण्यापासून दोघे देखील प्रत्येकी ३ विकेट्स दूर आहेत. अशा परिस्थितीत, यावेळीचा टी-२० आशिया कप भारत आणि अफगाणिस्तानच्या दोन्ही खेळाडूंसाठी महत्वाचा आणि एक मोठी संधी घेऊन येणारा असणार आहे.