फोटो सौजन्य - सोशल मिडिया
Australia vs England 1st Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लड यांच्यामध्ये पाच सामन्यांची ऐतिहासिक मालिका खेळवली जात आहे. या मालिकेचा पहिल्या सामन्याला आजपासून सुरुवात झाली आहे, या मालिकेमध्ये पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघाने कमालीची कामगिरी केली आहे. आणि यामध्ये ऑस्ट्रेलियन गोलंदाज मिचेल स्टार्कने धुमाकुळ घातला आहे आणि त्याने एकही फलंदाजाला मैदानावर जास्तवेळ टिकू दिले नाही. या सामन्याच्या पहिल्या इंनिगमध्ये दोन्ही संघाची कामगिरी कशी राहिली यासंदर्भात सविस्तर जाणून घ्या.
आजच्या सामन्यामध्ये इंग्लडच्या फलंदाजामध्ये आज फक्त हॅरी ब्रुक याने चांगली खेळी खेळली. मिचेल स्टार्क याने आज 7 विकेट्स घेऊन पहिल्याच डावामध्ये कहर केला आहे. त्याचबरोबर ऑली पाॅप याने देखील चांगली खेळी खेळली पण तो मोठी खेळी खेळण्यात अपयशी ठरला. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी या पहिल्या डावामध्ये कमालीची कामगिरी केली आहे. ब्रेंडन डॉगेट याने संघासाठी 2 विकेट्स नावावर केले तर कॅमरीन ग्रीन याने 1 विकेट्स घेतला आहे.
WHAT A MOMENT! #MitchellStarc is on fire today. Ben Stokes departs! 😯#AUSvENG | THE ASHES | 1st Test | LIVE NOW 👉🏻 https://t.co/8oO6xoR7Gi pic.twitter.com/mI4w3ORp6s — Star Sports (@StarSportsIndia) November 21, 2025
इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तथापि, मिचेल स्टार्कने सात विकेट्स घेत त्यांचा निर्णय हाणून पाडला. पहिल्या डावात इंग्लंडचा डाव १७२ धावांवर संपला. इंग्लंडची सुरुवात खराब झाली. मिचेल स्टार्कने पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर झॅक क्रॉलीला बाद केले. त्यानंतर सातव्या षटकात स्टार्कने बेन डकेटला एलबीडब्ल्यू करत त्याची दुसरी विकेट घेतली. स्टार्कचा तिसरा आणि सर्वात मोठा विजय नवव्या षटकात आला जेव्हा त्याने जो रूटला बाद केले.
रूट त्याचे खाते उघडू शकला नाही. त्यानंतर ऑली पोपने हॅरी ब्रूकसोबत अर्धशतकी भागीदारी केली. इंग्लंडचा चौथा बळी कॅमेरॉन ग्रीनने ऑली पोपला ४६ धावांवर बाद केले. दुपारच्या जेवणानंतर मिचेल स्टार्कने बेन स्टोक्स आणि अॅटकिन्सनला बाद करून धावसंख्या उघडली, तर डॉगेटने हॅरी ब्रुकला बाद करून त्याची पहिली कसोटी विकेट घेतली. स्टार्कने १२.५ षटकांत ५८ धावा देत ७ बळी घेतले. दुसऱ्या डावाला सुरुवात झाली आहे.






