फोटो सौजन्य - instagram सोशल मीडिया
श्रीलंका विरुद्ध ऑस्ट्रेलिया एकदिवसीय मालिका : श्रीलंका विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये नुकतीच दोन सामान्यांची कसोटी मालिका झाली. या मालिकेमध्ये ऑस्ट्रेलियाच्या संघाने श्रीलंकेला घरच्या मैदानावर २-० असे पराभूत करून दणदणीत विजय मिळवला. आता ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यामध्ये दोन सामान्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेचा पहिला सामना १२ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर करण्यात आला आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे संघाची घोषणा कर्णधाराशिवाय करण्यात आली आहे.
स्टीव्ह स्मिथ संघात आहे, पण त्याला कर्णधारपद देण्यात आलेले नाही. या मालिकेत पॅट कमिन्स, मिचेल मार्श, जोश हेझलवूड संघाचा भाग असणार नाहीत. एकदिवसीय मालिका १२ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे, तर दुसरा सामना १४ फेब्रुवारी रोजी खेळवला जाणार आहे. निवडकर्त्यांनी जॅक फ्रेझर, तन्वीर संघा, स्पेन्सर जॉन्सन सारख्या तरुण खेळाडूंवर बाजी मारली आहे.
श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी निवडण्यात आलेल्या ऑस्ट्रेलियन संघात कोणत्याही खेळाडूला कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आलेली नाही. जॅक फ्रेझर मॅकगर्क यांनाही संघात स्थान देण्यात आले आहे. ट्रॅव्हिस हेड आणि मॅथ्यू शॉर्ट सलामीवीरांच्या भूमिकेत दिसतील. त्याच वेळी, मधल्या फळीची जबाबदारी स्टीव्ह स्मिथ, मार्नस लाबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, जोश इंग्लिस यांसारख्या फलंदाजांवर असेल.
त्याच वेळी, मिचेल स्टार्क वेगवान गोलंदाजीचे नेतृत्व करताना दिसणार आहे. नॅथन एलिस, स्पेन्सर जॉन्सन, बेन डोरिश आणि शॉन अॅबॉट त्याला पाठिंबा देताना दिसतील. तन्वीर संघा फिरकी गोलंदाजी सांभाळताना दिसतील. अॅडम झांपाला संघात स्थान देण्यात आलेले नाही.
श्रीलंकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत स्टीव्ह स्मिथ संघाचे नेतृत्व करताना दिसू शकतो. स्मिथने कसोटी मालिकेतही संघाचे नेतृत्व केले. स्मिथच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत श्रीलंकेचा २-० असा पराभव केला. स्मिथला कर्णधार म्हणूनही खूप अनुभव आहे. कांगारू संघासाठी चांगली गोष्ट म्हणजे स्मिथ फलंदाजीसह फॉर्ममध्ये परतला आहे.
Australia’s squad for the two ODIs against Sri Lanka with the captain yet to be confirmed 🇦🇺
Originally selected players who were withdrawn: Stoinis, Cummins, Hazlewood, Marsh pic.twitter.com/cEu2bfJpxd
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) February 9, 2025
एकदिवसीय मालिकेत ऑस्ट्रेलियाला त्यांच्या अनेक स्टार खेळाडूंची उणीव भासेल. दुखापतीमुळे पॅट कमिन्स आणि जोश हेझलवूड या मालिकेतून तसेच चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर पडले आहेत. त्याच वेळी, मार्कस स्टोइनिसने या फॉरमॅटला अलविदा म्हटले आहे. मिचेल मार्श देखील दुखापतीमुळे श्रीलंकेविरुद्ध खेळताना दिसणार नाही.
ट्रॅव्हिस हेड, ॲरॉन हार्डी, मिचेल स्टार्क, मॅट शॉर्ट, ग्लेन मॅक्सवेल, नॅथन एलिस, स्टीव्ह स्मिथ, कूपर कॉनोली, स्पेन्सर जॉन्सन, मार्नस लॅबुशेन, शॉन ॲबॉट, तन्वीर संघा, जोश इंग्लिस, बेन द्वारशुइस, ॲलेक्स केरी, जेक फ्रेझर मॅकगर्क