टीम ऑस्ट्रेलिया(फोटो-सोशल मीडिया)
ICC Ranking : नुकत्याच झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ च्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला पराभूत करून जेतेपद पटकावले आहे. सुमारे २७ वर्षांनंतर साऊथ आफ्रिकेने आयसीसी ट्रॉफी जिंकण्यात यश मिळवले आहे. तर दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाचे सलग दुसऱ्यांदा जेतेपद जिंकण्याचे स्वप्न आधुरे राहिले. यापूर्वी २०२३ मध्ये ऑस्ट्रेलियाने भारताला पराभूत करून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ जेतेपद पटकावले होते.
अशा परिस्थितीत, यावेळीही त्यांच्याकडून या हंगामात देखील खूप अपेक्षा होत्या, परंतु त्यांना त्या परून करता आल्या नाहीत. तरी देखील त्यांनी आयसीसीरँकिंगमध्ये आपले वर्चस्व कायम ठेवण्यात मात्र यश मिळवले आहे. जर दक्षिण आफ्रिकेबद्दल सांगायचे झाल्यास तर त्यांना आयसीसी रँकिंगमध्ये मोठा फायदा झाला आहे. त्याच वेळी, भारतीय क्रिकेट संघ जैसे थे स्थानावर आहे.
हेही वाचा : ६ वर्षांनंतर Smriti Mandhana चा धूम धडाका! एकदिवसीय क्रमवारीत पटकवला पहिला नंबर..
ऑस्ट्रेलिया संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना गमवावा लागला. तेव्हा वाटले की, आयसीसी रँकिंगमध्ये त्यांना मोठा फटका बसेल, मात्र असे काही झाले नाही. आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये ऑस्ट्रेलिया अजूनही पहिल्या स्थानावर कायम आहे. सध्या, त्याचे रेटिंग गुण १२३ इतके आहे.
तसेच दक्षिण आफ्रिकेला जागतिक कसोटी अजिंक्यपद जिंकण्याचा मोठा फायदा झाला आहे. आता त्यांनी तिसऱ्या स्थानावरून दुसऱ्या स्थानावर झेप घतेली आहे. दक्षिण आफ्रिकेचे रेटिंग ११४ आहे. त्याच वेळी, इंग्लंडला गुणाचा फटका बसला आहे. ते ११३ रेटिंग गुणांसह तिसऱ्या स्थानावर घसरले आहे.
हेही वाचा : Ravichandran Ashwin च्या अडचणीत वाढ! मदुराई पँथर्सने केला ‘हा’ गंभीर आरोप, बंदी लागण्याची दाट शकता…
भारतीय संघाची स्टार सलामीवीर स्मृती मानधना आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत पुन्हा पहिल्या नंबरव विराजमान झाली आहे. यादी जाहीर होण्यापूर्वी ती दुसऱ्या स्थानावर होती तर लॉरा वोल्वार्ड नंबर वन होती. आता लॉरा तिसऱ्या क्रमांकावर घरसली असून इंग्लंडची खेळाडू नॅट सायव्हर ब्रंट दुसऱ्या स्थानावर पोहचली आहे. यापूर्वी ती तिसऱ्या स्थानावर होती. यानुसार, स्मृती मानधना आणि नॅट सायव्हर यांना १-१ गुण मिळाले आहेत तर, लॉरा वोल्वार्ड्स यांना २ गुण मात्र कमी झाले आहेत.