फोटो सौजन्य - सोशल मीडिया
ऑस्ट्रेलियाच्या मिचेल मार्शचा सुपरमॅन कॅच : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये बॉर्डर गावसकर ट्रॉफीचा तिसरा सामना सुरु आहे. यामध्ये नाणेफेक जिंकून भारताच्या संघाने गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय भारताच्या संघाला महागात पडला आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघाने सुरुवातीपासून दबदबा पाहायला मिळाला आहे. टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी घाम गाळला.
गाबा येथे खेळल्या जात असलेल्या तिसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या मिचेल मार्शने अप्रतिम क्षेत्ररक्षणाचे प्रदर्शन केले. ऑस्ट्रेलियन संघाने पहिल्या डावात 445 धावांची मोठी मजल मारली. याला प्रत्युत्तर म्हणून पहिल्या डावात भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. मिचेल स्टार्कने दुसऱ्या चेंडूवर यशस्वीला बाद केले. यशस्वीला मिचेल मार्शने झेलबाद केले. यानंतर स्टार्कने गिलला आपला शिकार बनवले. गिललाही मिचेल मार्शने झेलबाद केले. त्याने ज्या पद्धतीने गिलचा झेल घेतला त्याचे सर्वजण कौतुक करत आहेत. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
BAN vs WI : पहिल्यांदा बांग्लादेशने वेस्ट इंडिजला केलं पराभूत! 3 ओव्हरमध्ये केला गेम ओव्हर
वास्तविक, मिचेल मार्शचा झेल घेतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मिचेल स्टार्कने डावाच्या तिसऱ्या षटकाचा पहिला चेंडू टाकल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. गिलने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर खेळपट्टीच्या दिशेने गेला आणि मिचेल मार्शने डावीकडे उडी मारताना दोन्ही हातांनी तो पकडला. हा झेल घेतल्यानंतर मार्श आनंदाने धावला, कारण तो त्याच्या प्रयत्नाने आनंदी दिसत होता. मिचेल मार्श चेंडूपासून दूर होता, पण त्याने अप्रतिम डाईव्ह टाकून झेल घेतल्याचे दिसून येत आहे. मार्शचा डायव्ह पाहून तुम्ही त्याला सुपरमॅन म्हणू शकता. मिचेल मार्शचा झेल खरोखरच पाहण्यासारखा होता, ज्याचे खूप कौतुक केले जात आहे, तर गिल अवघ्या 1 धावा करून स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये परतला.
Mitchell Marsh — Flying Marsh..at Gully….
Gives a shocker to @ShubmanGill for his shocker shot.#INDvsAUS pic.twitter.com/hYlSbx7rV6
— alekhaNikun (@nikun28) December 16, 2024
ऑस्ट्रेलियन संघाचा पहिला डाव 445 धावांवरच आटोपला. यानंतर भारतीय संघाचा पहिला डाव सुरू झाला. यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुल यांनी भारताच्या डावाची सुरुवात केली. पहिल्या चेंडूवर जैस्वालने चौकार मारला, पण दुसऱ्या चेंडूवर मिचेल स्टार्कने त्याला बाद केले. जैस्वाल फ्लिक शॉट खेळायला गेला आणि मिचेल मार्शच्या चेंडूवर स्टार्कने त्याचा झेल घेतला. यानंतर स्टार्कने गिलला मार्शकरवी झेलबाद केले. त्याचवेळी विराट कोहलीही केवळ 3 धावा करून निघून गेला. लंच ब्रेकपर्यंत भारतीय संघाची धावसंख्या 22/3 होती.
पावसामुळे हा सामना मधेमधे थांबवला जात आहे. त्यामुळे आता सध्या भारताच्या संघाने ४८ धावा करून चार विकेट्स गमावले आहेत. आता टीम इंडियासाठी रोहित शर्मा आणि केएल राहुल हे संघासाठी फलंदाजी करत आहेत.