श्रेयस अय्यर(फोटो-सोशल मीडिया)
Updates from BCCI regarding Shreyas Iyer : भारतीय संघाचा महत्वाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यर अलिकडेच उत्कृष्ट फॉर्ममध्ये असल्याचे दिसत आहे. त्याचे नाव सध्या खुप चर्चेत आहे. सर्वात आधी इंग्लंड दौऱ्यावेळआय भारतीय संघात त्याला संधी देण्यात आली नव्हती तेव्हा तो चर्चेत आला होता. त्यानंतर अनेकांनी श्रेयसचे नाव का वगळले म्हणून आपल्या प्रतिक्रिया दिल्या होत्या. त्यांनंतर आशिया कप २०२५ (Asia cup 2025) संघात देखील त्याला डावलण्यात आले होते. त्यानंतर, श्रेयस अय्यरकडे भारत अ आणि ऑस्ट्रेलिया अ यांच्यातील सुरू असलेल्या रेड बॉल मालिकेचे नेतृत्व करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली. त्याने या मालिकेतील पहिला सामना खेळला आणि अचानक रेड बॉल क्रिकेटमधून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने हा निर्णय का घेतला आहे? याबाबत कुणाला काही एक कल्पना नव्हती. आता याबाबत बीसीसीआयने आपली चुप्पी तोडली आहे. याबाबत आपण जाणून घेऊया.
हेही वाचा : IND vs AUS : BCCI ने केली संघाची घोषणा! श्रेयस अय्यर सांभाळणार संघाची धुरा, या खेळाडूंना संघामधून वगळलं
भारताचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यरकडून अलीकडेच रेड बॉल क्रिकेटमधून सहा महिन्यांचा ब्रेक घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बीसीसीआयने या निर्णयाला दुजोरा दिला आहे. बीसीसीआयने असे म्हटले आहे की, श्रेयस अय्यरने स्वतः बोर्डाला या निर्णयाची माहिती दिली होती. यामागील मुख्य कारण सांगताना बीसीसीआयने जारण सांगितले आहे की, या ब्रेक मागे त्याची पाठदुखी हे एक कारण आहे.अय्यरने अलीकडेच यूकेमध्ये पाठीची शस्त्रक्रिया करून घेतली आहे. सुरुवातीला ते पूर्णपणे बरे दिसत होते, परंतु दीर्घ स्वरूपाच्या सामन्यांदरम्यान त्याला वारंवार पाठीत दुखणे आणि कडकपणा जाणवू लागला होता. त्यामुळे त्याने आता सहा महिन्याचा ब्रेक घेतला आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ऑस्ट्रेलिया अ विरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारत अ आणि शेष भारत संघ जाहीर केला आहे. या संघाच्या कर्णधारपदी श्रेयस अय्यरची नियुक्ती केली आहे. या मालिकेतील पहिला सामना ३० सप्टेंबर रोजी कानपूर येथे खेळवण्यात येणार आहे, तर शेष भारत संघ १ ऑक्टोबर रोजी विदर्भाशी सामना करणार आहे. ऑस्ट्रेलिया अ विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी अय्यरकडे भारत अ संघाचा कर्णधार म्हणून जबाबदरी सोपवण्यात आली आहे.