काय घडलं?
या प्रकरणातील आत्महत्या करणाऱ्या मुलाचे नाव अनिल पवार (वय 21) असे आहे. तर सावत्र आईचे नाव अनिता असे आहे. या दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. हे सूत इतके टोकाला गेले की, काही दिवसांपूर्वी अनिल आणि अनिता हे दोघे घरातून थेट तेलंगणा राज्यात पळून गेले. आपली पत्नी आणि मुलगा दोघेही बेपत्ता झाल्याने पतीने तातडीने पोलिसात धाव घेतली.
Navi Mumbai Crime: ‘नशामुक्त भारत २०२८’ अंतर्गत धडक कारवाई; सराईत आरोपीवर PIT NDPS लागू
पोलिसांनी तातडीने चक्र फिरवत तेलंगणा गाठून त्या दोघांनाही ताब्यात घेतले. आपले अनैतिक संबंध आता सगळ्यांना समजले आहेत या भीतीपोटी आणि नैराश्यातून अनिल याने विषारी औषध प्राशन केले. प्रकृती खालावल्याने नातेवाईकांनी त्याला अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरु असतानांच अनिलचा मृत्यू झाला.
अनिल याच्या मृत्यूची बातमी समजताच अनिताला तीव्र धक्का बसला. हा विरह सहन न झाल्याने तिने देखील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय सभागृहाच्या पाठीमागे असलेल्या एका झाडाला गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
नराधम आजोबांनीच केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार; चौकशीत आणखी एक धक्कदायक माहिती समोर
बीड येथून एक नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. एका पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर साठ वर्षाच्या आजोबांनीच अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. एवढेच नाही तर चौकशीत पीडितेच्या चुलत भावाने देखील अत्याचार केल्याचे समोर आले आहे. या घटनेने संताप व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात आजोबा आणि चुलत भाऊ यांच्यावर पोक्सो ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका आरोपीला पोलिसांनी जेरबंद केले आहे. ही घटना नेकनूर पोलीस ठाणे हद्दीतील आहे. या घटनेने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.
Beed Crime: नराधम आजोबांनीच केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार; चौकशीत आणखी एक धक्कदायक माहिती समोर
Ans: बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई आणि केज परिसरात ही धक्कादायक घटना घडली.
Ans: सावत्र आईसोबतचे संबंध उघड झाल्याने बदनामी आणि नैराश्यातून त्याने विष प्राशन केल्याचे सांगितले जात आहे.
Ans: अनिलच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने तिने रुग्णालय परिसरातील झाडाला गळफास घेत आत्महत्या केली.






