पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, सहआयुक्त दीपक साकोरे, अपर पोलीस आयुक्त प्रमोद शेवाळे आणि गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली “नशामुक्त भारत २०२८” अभियानांतर्गत ही कारवाई करण्यात आली.
Beed Crime: नराधम आजोबांनीच केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार; चौकशीत आणखी एक धक्कदायक माहिती समोर
राजन राठोड (रा. अण्णाभाऊ साठे नगर, मानखुर्द, मुंबई) याच्यावर नवी मुंबई व मुंबई परिसरात एनडीपीएस कायद्यान्वये चार गुन्हे दाखल असून खुनाचा प्रयत्न, मारामारी व दरोडा यांसारखे पाच गंभीर गुन्हेही नोंद आहेत. आरोपी मुंबईहून नवी मुंबईत येऊन अमली पदार्थांची विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
सराईत गुन्हेगार असल्याने राठोड याच्याविरोधात PIT NDPS अंतर्गत गृह मंत्रालयाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता. गृह मंत्रालयाने मंजुरी दिल्यानंतर आरोपीला वर्षभरासाठी येरवडा कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले.
ही कारवाई सहाय्यक पोलीस आयुक्त धर्मपाल बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थ विरोधी पथकाने केली.
नवी मुंबईत मुलगी बेपत्ता, न्याय मागण्यासाठी गेलेल्या नातेवाईकांवरच पोलिसांचा गुन्हा
नवी मुंबईतील रबाळे पोलीस ठाण्यात गोंधळ पाहायला मिळाला. एका व्यक्तीच्या घरातून मुलगी गायब झाली होती. घरी शोध घेतल्यावर नातेवाईक यांनी इकडे तिकडे विचारपूस केली. मात्र मुलीचा काही केल्या शोध लागला नाही. तेव्हा घरातील सगळे हे रबाळे पोलीस ठाण्यात गेले आणि त्यांनी तक्रार दिली. मात्र आमची मुलगी शोधून द्या अन्यथा आम्ही पोलिस स्टेशन सोडणार नाही. अशी त्यांनी भूमिका घेतल्यावर पोलीस ठाण्यातच मुलीच्या नातेवाईक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोशल मिडिया क्रिएटरने संपवलं आयुष्य, ‘हॉटेल ग्रामपंचायत’च्या स्वयंपाकघरात घेतला गळफास
Ans: त्याच्यावर PIT NDPS कायद्यान्वये कारवाई करण्यात आली.
Ans: आरोपीला पुण्यातील येरवडा कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले.
Ans: आरोपीवर एनडीपीएससह खूनाचा प्रयत्न, मारामारी आणि दरोड्यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत.






