AI-सपोर्टेड स्मार्ट टीव्हींची नवी रेंज! Samsung ने लॉन्च केला 2026 Vision AI TV Lineup
मुंबई : सॅमसंग इंडियाने संपूर्ण २०२६ व्हिजन एआय टीव्ही लाइनअपच्या लाँचची घोषणा केली. या लाइनअपमध्ये मायक्रो आरजीबी, ओएलईडी, निओ क्युएलईडी, द फ्रेम, मिनी एलईडी आणि युएचडी टीव्हीचा समावेश आहे. या लाँचसह सॅमसंग आपल्या सर्व मॉडेल्समध्ये एआय-समर्थित वैशिष्ट्यांचा विस्तार करत आहे, तसेच भारतातील अधिकाधिक ग्राहकांसाठी अधिक स्मार्ट पिक्चर, साऊंड आणि वैयक्तिकृत व्युईंग अनुभव घेऊन येत आहे. सॅमसंग सलग २० वर्षांपासून जागतिक स्तरावर पहिल्या क्रमांकाचा टीव्ही ब्रँड आहे.
सॅमसंगच्या ४के आणि त्यावरील टीव्ही श्रेणीमध्ये व्हिजन एआय कम्पॅनियन (व्हीएसी) वैशिष्ट्यांच्या झालेल्या या विस्तारीकरणामधून एआय- तंत्रज्ञानाला टीव्ही अनुभवाचा मुख्य भाग बनवण्याप्रती ब्रँडचे व्यापक धोरण दिसून येते. या विस्तारामुळे एआय-आधारित व्युईंग अनुभव अधिक श्रेणी, स्क्रीन आकार आणि ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी उपलब्ध झाला आहे.
“आमची व्हिजन एआय टीव्हीची नवीन श्रेणी स्थानिक कन्टेंट प्लॅटफॉर्म्सना विनासायासपणे जोडते, बहुभाषिक सपोर्ट वाढवते आणि भारतातील व्यक्तींच्या वैविध्यपूर्ण जीवनशैलीसाठी ऊर्जा-बचत करणारे पर्याय उपलब्ध करून देते,” असे सॅमसंग इंडियाच्या व्हिज्युअल डिस्प्ले बिझनेसचे उपाध्यक्ष विप्लेश डांग म्हणाले.
तुमच्याही फोनमध्ये ही Privacy Settings ऑन आहे का? आजच करा ऑफ, एक्सपर्टने दिलाय अलर्ट
सॅमसंगच्या व्हिजन एआय कम्पॅनियनमुळे ग्राहकांना अधिक स्मार्ट आणि सर्वोत्तम व्युईंग अनुभव मिळणार असून या एआय टीव्ही लाइनअपमध्ये चित्रपट, क्रीडा आणि गेमिंगसाठी एआय-वर्धित मनोरंजनाची विशेष वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. यामध्ये समाविष्ट असलेले ‘एआय अपस्केलिंग प्रो’ हे तंत्रज्ञान रिअल टाइममध्ये कमी-रिझोल्यूशनच्या कन्टेंटचे विश्लेषण आणि सुधारणा करण्यासाठी एआयचा प्रभावी वापर करते, ज्यामुळे चित्रात अधिक तपशील, खोली आणि कॉन्ट्रास्ट पाहायला मिळतो; तर ‘कलर बूस्टर प्रो’ अधिक वैविध्यपूर्ण व वास्तविक रंगसंगती प्रदान करण्यासाठी दृश्यांचे अचूक विश्लेषण आणि वर्गीकरण करते. विशेषतः खेळप्रेमींसाठी असलेल्या ‘एआय सॉकर मोड’मुळे चेंडूची सुलभ हालचाल, वैविध्यपूर्ण रंगसंगती आणि थेट स्टेडियममधील सर्वोत्तम ऑडिओचा अनुभव घेण्यासाठी रिअल टाइममध्ये सामन्याच्या दृश्यांचे विश्लेषण करून पिक्चर व साऊंडमध्ये उत्तम सुधारणा केली जाते. याशिवाय, ‘एआय साऊंड कंट्रोलर प्रो’ रिअल टाइममध्ये संवाद, पार्श्वभूमी संगीत आणि साऊंड इफेक्ट्सचे विश्लेषण करतो, ज्यामुळे ग्राहकांना आपल्या आवडीनुसार कॉमेंट्री आणि प्रेक्षकांचा आवाज यांसारखे घटक सोयीनुसार बदलता येतात आणि घरबसल्या थिएटरसारखा सर्वोत्तम अनुभव घेता येतो.
भारतात मायक्रो आरजीबीच्या पदार्पणामुळे सॅमसंगचा प्रीमियम टीव्ही अनुभव स्क्रीन आकाराच्या अधिक विस्तृत श्रेणीमध्ये विस्तारला आहे. ज्यामुळे अधिक ग्राहकांसाठी अत्यंत अचूक रंग, ब्राइटनेस आणि सर्वोत्तम एआय-समर्थित व्युईंग अनुभव उपलब्ध झाला आहे. ५५ ते ११५ इंच आकारातील आर९५एच आणि आर८५एच सिरीजमध्ये उपलब्ध असलेले मायक्रो आरजीबी सॅमसंगच्या मालकीच्या मायक्रो आरजीबी तंत्रज्ञानावर आधारित आहे, जे अत्यंत अचूक प्रकाश नियंत्रण, अधिक समृद्ध तपशील आणि अधिक नैसर्गिक रंग प्रदान करण्यासाठी स्वतंत्रपणे नियंत्रित केलेल्या लाल, हिरव्या आणि निळ्या मायक्रो एलईडीचा वापर करते.
सॅमसंगच्या २०२६ ओएलईडी टीव्हीमध्ये एस९५एच, एस९०एचआणि एस८५एचचा समावेश आहे, जे टीव्ही पाहण्याच्या अधिक विस्तृत आवडीनिवडींमध्ये गडद काळा रंग, समृद्ध रंग, सर्वोत्तम कार्यक्षमता आणि उत्कृष्ट डिझाइन देतात. ग्लेअर-फ्री तंत्रज्ञान, जे आधी फक्त एस९५ मॉडेलवर उपलब्ध होते, आता एस९५एच आणि एस९०एच या दोन्ही मॉडेल्सवर विस्तारले आहे, जे अगदी उजळ प्रकाश असलेल्या रूममध्ये देखील डिस्प्लेचा खरा काळा रंग आणि समृद्ध रंग स्पष्ट व विनाअडथळा राहण्यास मदत करते.
सॅमसंगची वर्ष २०२६ ची ही लेटेस्ट टीव्ही लाइनअप आजपासूनच कंपनीच्या सर्व रिटेल स्टोअर्स, अधिकृत वेबसाइट (Samsung.com) आणि देशातील आघाडीच्या ऑफलाइन व ऑनलाइन रिटेल चॅनल्सवर विक्रीसाठी उपलब्ध झाली आहे. या आकर्षक लाँचिंग ऑफर्स अंतर्गत निवडक टीव्ही मॉडेल्सच्या खरेदीवर ग्राहकांना १०२९९० रुपये किमतीचा मोफत (कॉम्प्लिमेंट्री) साऊंडबार आणि २३९९० रुपये किमतीचा मोफत म्युझिक स्टुडिओ दिला जात आहे. याव्यतिरिक्त, ही खरेदी ग्राहकांसाठी अधिक फायदेशीर करण्यासाठी २० टक्क्यांपर्यंतचा आकर्षक कॅशबॅक आणि सोयीस्कर ईएमआई पर्यायही उपलब्ध करून देण्यात आले आहेत. किमतींचा विचार केला तर या नव्या श्रेणीमध्ये विविध प्रकारचे पर्याय उपलब्ध आहेत; ज्यामध्ये सॅमसंग मायक्रो आरजीबी श्रेणीची किंमत १२४९९० रुपयांपासून, तर ओएलईडी श्रेणीची किंमत ११४९९० रुपयांपासून सुरू होते. तसेच, स्टायलिश ‘द फ्रेम’ टीव्ही श्रेणी ५६९९० रुपये, निओ क्युएलईडी श्रेणी ५२९९० रुपये, मिनी एलईडी श्रेणी ४२९९० रुपये आणि युएचडी टीव्ही श्रेणी अवघ्या ३६९९० रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत ग्राहकांसाठी उपलब्ध आहे.






