आशिया कप २०२२ (Asia Cup 2022) ही क्रिकेट स्पर्धा २७ ऑगस्ट पासून सुरु होणार आहे. यासाठी सध्या भारतीय संघ हा यूएई (UAE) मध्ये पोहोचला असून सध्या खेळाडू या स्पर्धेसाठी कसून सर्व करीत आहेत. मात्र या टूर्नामेंट आधीच भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने गुरुवारी रात्री सोशल मीडियावर पोस्ट केली. त्यात त्याने ‘७+१८’ याचा उल्लेख केला असून त्याची ही पोस्ट सध्या खूप चर्चेत आहे.
सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये विराट कोहलीने ‘७+१८’ असा उल्लेख करत माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी (MahendraSingh Dhoni) सोबत त्याचा एक जुना फोटो शेअर केला आहे. यावर विराटने लिहिले की, या व्यक्तीचा विश्वासू उपनियुक्त बनणे हा माझ्या करिअरमधील सर्वात आनंदाचा टप्पा होता. आमची भागीदारी माझ्यासाठी नेहमीच खास असेल. विराटच्या या भावनिक पोस्टने सर्व क्रिकेट चाहत्यांची मने जिंकली आहेत. त्याच्या या पोस्टला आतापर्यंत २३ लाखांहून अधिक लाईक्स इंस्टाग्रामवर मिळाले आहेत.
Being this man’s trusted deputy was the most enjoyable and exciting period in my career. Our partnerships would always be special to me forever. 7+18 ❤️ pic.twitter.com/PafGRkMH0Y
— Virat Kohli (@imVkohli) August 25, 2022
कोहलीने २००८ मध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली पदार्पण केले. कोहलीच्या कारकिर्दीला आकार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या धोनीने नंतर कर्णधारपदाची जबाबदारी त्याच्यावर सोपवली. २०१४ मध्ये कोहली पहिल्यांदाच कसोटीत कर्णधार बनला, त्यानंतर त्याला वनडे आणि टी-२० संघांचेही कर्णधारपद मिळाले.