पर्थ टेस्टपूर्वी भारतीय संघात देवदत्त पडिक्कलचा समावेश; टीम इंडियाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये अनेक बदल
Border Gavaskar Trophy : पर्थ टेस्टपूर्वी भारतीय संघात देवदत्त पडिक्कलचा समावेश करण्यात आला आहे. उद्यापासून भारत विरुद्ध आॅस्ट्रेलिया संघात कसोटी सामन्याची सुरुवात होणार आहे. पर्थ कसोटीत टीम इंडिया कांगारूंबरोबर दोन हात करणार आहे. भारतीय संघाचा सलामीवीर शुभमन गील हा दुखापतग्रस्त झाल्याने देवदत्त पडिक्कलला भारतीय संघात समाविष्ट करण्यात आले आहे.
भारताच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये मोठा बदल
भारतीय संघाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आला आहे. शुभमन गील जखमी झाल्याने त्याला बाहेर करण्यात आले आहे. इंट्रा-स्क्वाॅड सामन्यादरम्यान डाव्या हाताला अंगठा लागला आहे. बुधवारी भारतबरोबर झालेल्या अभ्याससत्रादरम्यान त्याला मोठी दुखापत झाली. यामुळे निवडकर्त्यांनी देवदत्त पडिक्कलचा टीम इंडियामध्ये समावेश केला.
मोहम्मद शमीसुद्धा भारतीय संघात दिसणार
मोहम्मद शामीला टीम इंडियातून एक वर्षाहून अधिक काळ लोटला आहे. 2023 च्या एकदिवसीय विश्वचषक फायनलमध्ये त्याने टीम इंडियासाठी शेवटचा सामना खेळला होता, जो 19 नोव्हेंबर रोजी खेळला गेला होता. आता मोहम्मद शमीने रणजी ट्रॉफीद्वारे व्यावसायिक क्रिकेटमध्ये पुनरागमन केले असले तरी तो अद्याप टीम इंडियामध्ये परतलेला नाही. भारताच्या संघाची १८ खेळाडूंची घोषणा बीसीसीआयने केली आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्मा पहिल्या कसोटी सामन्यात उपस्थित नसणार आहे. त्यामुळे भारतीय संघाची कमान जसप्रीत बुमराहकडे सोपवण्यात आली आहे.
टीम इंडिया 22 नोव्हेंबरपासून ऑस्ट्रेलियात
22 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी टीम इंडिया ऑस्ट्रेलियात आहे. या मालिकेतील पहिला सामना पर्थमध्ये खेळवला जाईल, ज्यामध्ये रोहित शर्माच्या अनुपस्थितीत जसप्रीत बुमराह टीम इंडियाची धुरा सांभाळताना दिसणार आहे. मालिका सुरू होण्यापूर्वी जसप्रीत बुमराहने पत्रकार परिषदेत भाग घेतला, ज्यामध्ये त्याने महान वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीबद्दल अपडेट दिले.
रोहित शर्मा बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा पहिला कसोटी सामना खेळणार नाही
भारताचा कर्णधार रोहित शर्मा बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा पहिला कसोटी सामना खेळणार नाही हे स्पष्ट झाले आहे. रोहित शर्मा दुसऱ्यांदा बाप झाल्यामुळे तो अजूनही मुंबईमध्ये आहे पण यासंदर्भात माहिती बीसीसीआयने अधिकृत माहिती दिलेली नाही. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2024-25 च्या पहिल्या सामन्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने अद्याप अधिकृतपणे कर्णधार कोण असणार याची पुष्टी केलेली नाही, परंतु आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच ICC ने याची पुष्टी केली आहे. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत जसप्रीत बुमराह पर्थ कसोटी सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार असेल अशी माहिती आयसीसीने दिली आहे.