बॉलिवूड (Bollywood) आणि क्रिकेटच (Cricket) नातं काही नवं नाही. जसे बॉलिवूड कलाकार क्रिकेटच्या मैदानावर रुळताना दिसतात तसेच क्रिकेटर देखील बॉलिवूडच्या झगमगाटात मोकळेपणाने वावरताना दिसतात. अशातच आता टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) क्रिकेटच्या पीचनंतर आता सिनेमाच्या पीचवर देखील कमाल करताना दिसणार आहे.
रोहित शर्माने स्वतः त्याच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून ही माहिती दिलीये. रोहित शर्माच्या पहिल्या बॉलिवूड चित्रपटाचं नाव ‘मेगा ब्लॉकबस्टर’ (Mega Blockbuster)आहे. या चित्रपटाची निर्मिती OSHEEM करणार आहे. त्याचबरोबर या चित्रपटात रोहित महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर ४ सप्टेंबर रोजी प्रदर्शित केला जाणार आहे.
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा व्यतिरिक्त, माजी भारतीय कर्णधार आणि बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली देखील मेगा ब्लॉकबस्टरमध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. सौरव गांगुलीनेही या चित्रपटाच्या पोस्टरचा फोटो सोशल मीडियावर शेअर सौरव गांगुली आणि रोहित शर्मासारख्या स्टार्सनी भरलेला हा चित्रपट क्रिकेट चाहत्यांचं भरपूर मनोरंजन करणार आहे. सर्व चाहते त्याच्या ट्रेलरची वाट पाहत आहेत. काही दिवसांपूर्वी भारताचा माजी क्रिकेटर इरफान खान हा महत्वाच्या भूमिकेत असणाऱ्या ‘कोब्रा’ या चित्रपटाची देखील घोषणा करण्यात आली होती.
इन्स्टाग्रामवर पोस्टर पोस्ट
भारतीय कर्णधार रोहित शर्माने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवरून मेगा ब्लॉकबस्टर या डेब्यू चित्रपटाचं पोस्टर शेअर केलंय. त्याने या पोस्टसोबत कॅप्शनमध्ये लिहिलंय की, नर्वस वाटतंय, हे एक वेगळं पदार्पण आहे. खरंतर, रोहित शर्मा पहिल्यांदाच चित्रपटात दिसणार आहे. ओशिम प्रॉडक्शन रोहित शर्माचा मेगा ब्लॉकबस्टर चित्रपट घेऊन येतोय.