फोटो सौजन्य - England Cricket सोशल मीडिया
Champions Trophy 2025 – England vs Australia : चॅम्पियन ट्रॉफी २०२५ च्या दुसऱ्या गटामध्ये म्हणजेच B गटाचा आज पहिला सामना होणार आहे. हा सामना दक्षिण आफ्रिका विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यामध्ये रंगणार आहे. तर २२फेब्रुवारी रोजी इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया या दोन क्रिकेटच्या बलाढ्य संघामध्ये महामुकाबला पाहायला मिळणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या ग्रुप डी मध्ये ऑस्ट्रेलियाचा सामना इंग्लंडशी होणार आहे. हा सामना लाहोरमध्ये खेळला जाईल. इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या सामन्यासाठी इंग्लिश संघाची घोषणा करण्यात आली आहे. इंग्लंडचा संघ जोस बटलरच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा खेळणार आहे. तर ऑस्ट्रेलियन संघाची कमान स्टीव्ह स्मिथकडे सोपवण्यात आली आहे.
जोस बटलरच्या नेतृत्वाखालील संघाने या महिन्याच्या सुरुवातीला भारताविरुद्ध शेवटचा एकदिवसीय सामना खेळलेल्या संघाच्या तुलनेत तीन बदल केले आहेत. एकदिवसीय संघात परतल्यानंतर यष्टीरक्षक जेमी स्मिथ यष्टीरक्षकपदाची जबाबदारी सांभाळणार आहे. दरम्यान, वेगवान गोलंदाजी विभागात, जोफ्रा आर्चरसोबत ब्रायडन कार्से आणि मार्क वूड असतील. फिरकी गोलंदाजीत, इंग्लंडने आदिल रशीदला कायम ठेवले आहे, त्याच्यासोबत लियाम लिव्हिंगस्टोन आणि जो रूट सारखे अर्धवेळ गोलंदाजी पर्याय असतील.
भारतात अपयशी ठरल्यानंतरही, फिल साल्ट अव्वल क्रमात राहील आणि बेन डकेटसोबत जोडी करेल. लियाम लिव्हिंगस्टोन आणि ब्रायडन कार्से यांना सामना पूर्ण करण्याचे काम देण्यात आले आहे आणि आदिल रशीदला एकमेव स्पेशालिस्ट स्पिनर म्हणून निवडण्यात आले आहे.
चॅम्पियन ट्रॉफीआधी इंग्लंडच्या संघाची तीन सामान्यांची एकदिवसीय मालिका भारताविरुद्ध झाली. या मालिकेमध्ये इंग्लंडचा संघाला ३-० ने मालिकेमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर आता पुन्हा जोस बटलरच्या नेतृत्वाखाली इंग्लंडचा संघ चॅम्पियन ट्रॉफीचा पहिला सामना संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार आहे.
ऑस्ट्रेलिया संघाबद्दल बोलायचं झालं तर कांगारूंच्या संघामधील अनेक खेळाडू दुखापतीमुळे बाहेर झाले आहेत. यामध्ये ऑस्ट्रेलियाचा मूळ कर्णधार पॅट कमिन्स देखील दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर झाला आहे.
We’ve named our XI for the first game against Australia 👇
— England Cricket (@englandcricket) February 20, 2025
जोस बटलर (कर्णधार), फिल साल्ट, बेन डकेट, जेमी स्मिथ (यष्टीरक्षक), जो रूट, हॅरी ब्रुक, लियाम लिव्हिंगस्टोन, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, मार्क वूड.
स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), नॅथन एलिस, जेक फ्रेझर-मॅकगर्क, आरोन हार्डी, ट्रॅव्हिस हेड, शॉन अॅबॉट, अॅलेक्स कॅरी, बेन द्वारशीस, जोश इंग्लिस, स्पेन्सर जॉन्सन, मार्नस लाबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, तन्वीर संघा, मॅथ्यू शॉर्ट आणि अॅडम झांपा.