इंग्लंडचा खेळाडू ख्रिस वोक्स (फोटो- @englandcricket )
Chris Woakes: आज भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात कसोटी सामना पार पडला. आजच्या शेवटच्या सामन्यात भारताने इंग्लंडवर ६ धावांनी विजय प्राप्त केला आहे. मोहम्मद सिराजने ५ विकेट्स घेत भारताला विजय मिळवून दिला आहे. ही मालिका बरोबरीत सुटली आहे, मात्र आज चर्चा इंग्लंडच्या ख्रिस वोक्सची होत आहे. दुखापतग्रस्त असून देखील ख्रिस वोक्स मैदानात संघासाठी खेळायला उतरला होता. याचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे.
खांदा फ्रॅक्चर झालेला असताना देखील ख्रिस वोक्स इंग्लंडला विजय मिळवून देण्यासाठी मैदानात उतरला होता. असह्य वेदना सहन करत तो केवळ आणि केवळ आपल्या संघाला जिंकवायचे आहे यासाठी खेळायला आला. याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ख्रिस वोक्सच्या खिलाडूवृत्तीचे सर्वच स्तरावरून कौतुक होत आहे.
Christopher Roger Woakes ❤️ pic.twitter.com/np2G5JIiJj
— England Cricket (@englandcricket) August 4, 2025
इंग्लंडला विजयासाठी १७ धावांची आवश्यकता होती. तर भारताला १ विकतेची गरज होती. तेव्हा ख्रिस वोक्स इंग्लंडच्या विजयासाठी मैदानात उतरला होता.
इंग्लंडला विजयासाठी १७ धावांची आवश्यकता होती. तर भारताला १ विकतेची गरज होती. तेव्हा ख्रिस वोक्स इंग्लंडच्या विजयासाठी मैदानात उतरला होता. जेव्हा १७ धावांची गरज होती तेव्हा इंग्लंडच्या ९ विकेट्स गेल्या होत्या. ख्रिस वोक्सची एकच विकेट शिल्लक होती. पहिल्या डावात तो खेळायला आला नव्हता. मात्र दुसऱ्या डावात संघाला गरज असताना तो मैदानात उतरला. त्याच्या खिलाडूवृत्तीने सर्वत्र कौतुक होत आहे.
इंग्लंडविरुद्ध DSP सिराजच सर्वोत्तम!
ओव्हलच्या सामन्यात मोहम्मद सिराजने कमल केली आहे. शेवटच्या डिव्हसी भारताला विजयासाठी ४ विक्ट्सची आवश्यकता होती. दरम्यान आज गोलंदाजी करताना सिराजने भेदक गोलंदाजी करत ४ पैकी ३ विकेट्स पटकावल्या. पूर्ण सामन्यात मोहम्मद सिराजने एकूण ९ विकेट्स घेतल्या. त्यातल्या ५ त्याने दुसऱ्या डावात घेतल्या. मोहम्मद सिराजने भारताकडून सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत.
मोहम्मद सिराजच ठरला सर्वोत्तम
अँडरसन-तेंडुलकर या सिरीजमध्ये भारताचे कसोटी सामन्यांसाठीचे नेतृत्व हे शुभमन गिलकडे सोवपण्यात आले होते. पहिला सामना भारत पराभूत झाला. तर दुसऱ्या सामन्यात भारत विजयी झाला.तिसऱ्या सामन्यात इंग्लड विजयी तर चौथ्या सामना टाय झाला. त्यामुळे मालिका बरोबरीत सोडवण्यासाठी भारताला या सामन्यात विजय आवश्यक होता. सिराजने भेदक गोलंदाजी करत भारताला विजय प्राप्त करून दिला आहे.