रविचंद्रन अश्विनच्या निवृत्तीमागे गौतम गंभीरच! रोहित शर्माच्या मागे झाले सर्व कांड; वाचा यामागची इनसाईड स्टोरी
R Ashwin Retirement Inside Story : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ब्रिस्बेन कसोटीत अनिर्णित राहण्यासाठी भारतीय खेळाडूंनी मेहनत घेतली. या निर्णयानंतर भारतीय शिबिरात जल्लोषाचे वातावरण होते, मात्र काही वेळातच त्यांचा एक वरिष्ठ खेळाडू निवृत्त झाल्याने शोककळा पसरली होती. मालिकेच्या मध्यावर रविचंद्रन अश्विनच्या अचानक निवृत्तीच्या निर्णयाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. अश्विनने पत्रकार परिषदेत भारतीय कर्णधार रोहित शर्मासोबत जाऊन निवृत्ती जाहीर केली. यामागचे कारण जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. पाहूया सविस्तर रिपोर्ट….
क्रिकेट चाहत्यांसाठी खरोखरच धक्कादायक निर्णय
रविचंद्रन अश्विनचा हा निर्णय जगभरातील क्रिकेट चाहत्यांसाठी खरोखरच धक्कादायक होता, परंतु ज्यांनी अश्विनला क्रिकेटच्या खेळपट्टीवर जवळून पाहिले आहे त्यांना हे माहित होते की, सर्व काही ठीक नाही. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या भूमिकेसह 2024-25 च्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या मध्यभागी बूट लटकवण्याच्या अश्विनच्या निर्णयामागील कथा PTI च्या अहवालात स्पष्ट केली आहे.
स्टेप बाय स्टेप मुद्दे जाणून घेण्याचा प्रयत्न
1. रविचंद्रन अश्विनला प्लेइंग-11 मध्ये स्थान मिळण्याची खात्री नसल्यास ऑस्ट्रेलियाला जायचे नव्हते. रोहित सेनेने न्यूझीलंडविरुद्ध क्लीन स्वीप केल्यानंतर, त्याला प्लेइंग-11 मध्ये स्थान मिळेल, अशी हमी कर्णधाराकडून मिळाली. त्याला सांगितले की वॉशिंग्टन सुंदर तिसरी निवड म्हणून फिरकी विभागात सामील झाला आहे.
2. पर्थ येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीसाठी वॉशिंग्टन सुंदरला प्लेइंग-11 मध्ये ठेवण्यात आल्याने अश्विनला धक्का बसला. सुंदर आणि अश्विन हे कमी-अधिक प्रमाणात एकाच प्रकारचे खेळाडू आहेत. अशा स्थितीत अश्विनच्या भावना दुखावल्या.
3. यानंतर अश्विनने कर्णधार रोहित शर्माशी चर्चा केली. जर गरज नसेल तर तो निवृत्त होण्यास तयार आहे, असे त्याने कर्णधाराला सांगितले. यावर रोहित शर्माने त्याला खात्री दिली की, तो भविष्यात प्लेइंग-11 चा भाग असेल. ॲडलेड कसोटीतही तो याच अटींवर खेळला होता.
4. आता रवींद्र जडेजा तिसऱ्या कसोटीत म्हणजेच ब्रिस्बेनमध्ये प्लेइंग-11 मध्ये सामील झाला. आता तामिळनाडूच्या फिरकीपटूला त्याचे भविष्य काय आहे हे समजले होते. निर्णय घेण्यास त्याला आता उशीर करायचा नव्हता. रोहित शर्माला प्लेइंग-11 मध्ये पाहण्याची इच्छा असण्याची शक्यता आहे.
5. गाब्बा नंतर सिडनीत भारतीय संघाच्या प्लेइंग-11 मध्ये दोन फिरकीपटू खेळले असतील यात शंका नाही, पण त्याला संधी मिळणार नाही हे अश्विनला समजले होते. आता तो संघातील तिसरी पसंती फिरकीपटू होता. एक प्रकारे, हा त्याच्यासाठी एक ट्रिगर संदेश होता.
6. येथे दावा केला जात आहे की, रोहित पर्थमध्ये नसताना प्रशिक्षक गौतम गंभीरने मोठा निर्णय घेतला होता. त्यानंतर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने आपल्या धाडसी निर्णयाला दुजोरा दिला आणि भविष्यात भारताचा नंबर 1 फिरकीपटू त्याची जागा घेईल असे सांगितले. तो नाही हे अश्विनला कळले.
7. 537 कसोटी बळी घेतल्यानंतर, वयाच्या 38 व्या वर्षी, अश्विनला माहित होते की तो पुढील जागतिक कसोटी चॅम्पियनशिप-2027 हंगाम खेळू शकणार नाही. यावेळी अंतिम फेरीत पोहोचण्याची शाश्वती नाही, तर अश्विनचा मान महत्त्वाचा आहे.
हेही वाचा : R Ashwin Retirement : टीम इंडियाच्या सपोर्ट स्टाफसोबत अश्विनची मस्ती, BCCI ने निवृत्तीनंतरचा VIDEO केला शेअर