फोटो सौजन्य - IndianPremierLeague सोशल मीडिया
CSK vs DC first innings report : चेन्नईच्या होमग्राउंडवर एम. ए. चिदंबरम स्टेडियम चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल यांच्यामध्ये सुरु असलेल्या सामन्याचा पहिला डाव झाला आहे. या पहिल्या डावात दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेलने नाणेफेक जिंकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. या सामन्यात पहिले फलंदाजी करत दिल्लीच्या संघाने चेन्नईसमोर १७० धावांचे लक्ष्य उभे केले आहे. दिल्ली कॅपिटल्सची या सामन्याची सुरुवात फार काही खास राहिली नाही. दिल्लीच्या संघाने या सामन्यात सलामीवीर फलंदाज जॅक फ्रॉसर मॅकगृक याचा विकेट गमावला. चेन्नई सुपर किंग्सचा हा चौथा सामना आहे तर दिल्ली कॅपिटलचा हा तिसरा सामना आहे.
मागील दोन सामन्यांमध्ये चेन्नईच्या संघाला सलग पराभवाचा सामना करावा लागला होता तर झालेल्या आयपीएल दोन हजार पंचवीस मधील सामन्यांमध्ये दिल्ली कॅपिटल्सला विजय मिळाला आहे. आजच्या सामान्यांच्या खेळाडूंच्या कामगिरीवर नजर टाकली तर दिल्ली कॅपिटल्सचा स्टार खेळाडू केएल राहुलने संघासाठी कमालीची फलंदाजी केली आहे. राहुलने संघासाठी ५१ चेंडूंमध्ये ७७ धावा केल्या. यामध्ये ३ षटकार आणि ६ चौकार मारले. तर खलील अहमदने त्याच्या पहिल्या ओव्हरमध्ये जादू दाखवली.
Jadeja 🤝 Dhoni = Chennai’s Delight 💛
🎥 Enjoy this moment of fielding brilliance from the two #CSK greats 🙌
Scorecard ▶ https://t.co/5jtlxucq9j #TATAIPL | #CSKvDC | @msdhoni | @imjadeja | @ChennaiIPL pic.twitter.com/rdC5qgDivB
— IndianPremierLeague (@IPL) April 5, 2025
दिल्ली कॅपिटल्ससाठी अभिषेक पोरेलने संघासाठी २० चेंडूंमध्ये ३३ धावा केल्या. यामध्ये त्याने १ षटकार आणि ४ चौकार मारले. दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेलने संघासाठी १४ चेंडूंमध्ये २१ धावा केल्या. तर समीर रिझविने संघासाठी २० धावांची खेळी खेळली. ट्रिस्टन स्टब्सने संघासाठी नाबाद २४ धावा केल्या. दिल्लीचा धुव्वादार फलंदाज आशुतोष शर्मा आज स्वस्तात बाद झाला.
आज चेन्नईच्या गोलंदाजाच्या कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर खलील अहमदने संघासाठी दोन विकेट घेतले तर नूर अहमद, रवींद्र जडेजा आणि महेश तीक्षणा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतला. आजच्या सामन्यांमध्ये डेवॉन कॉन्वेला प्लेइंग ११ मध्ये स्थान मिळाले आहे त्यामुळे आजच्या सामन्यात त्याच्या कामगिरीवर नजर असणार आहे. मागील सामन्यांमध्ये चेन्नई सुपर किंग्सची फलंदाजी निराशाजनक राहिली आहे. मागील सामन्यांमध्ये रवींद्र स्वस्तात बाद झाला होता. त्याचबरोबर विजय शंकर मागील सामन्यांमध्ये संधी मिळाली होती पण तो मोठी कामगिरी करण्यात अपयशी ठरला होता.
मागील सामन्यांमध्ये रवींद्र स्वस्तात बाद झाला होता. त्याचबरोबर विजय शंकर मागील सामन्यांमध्ये संधी मिळाली होती पण तो मोठी कामगिरी करण्यात अपयशी ठरला होता. आजच्या सामन्यांमध्ये १८३ धावांचे लक्ष्य चेन्नई सुपर किंग्सचा संघ गाठणार की नाही हे पाहणे मनोरंजक असणार आहे. पॉईंट टेबलवर चेन्नईचा संघ आठव्या स्थानावर आहे.