फोटो सौजन्य - X
सुरेश रैना : काल 25 मे रोजी चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यामध्ये सामना पार पडला. या सामन्यात गुजरातच्या संघाला चेन्नईच्या संघाने घरच्या मैदानावर 83 धावांनी पराभूत केले. चेन्नईच्या संघाने या सीझनमध्ये फार काही विशेष कामगिरी केली नाही संघ या सीझनमध्ये प्ले ऑफ मध्ये जाण्यात अपयशी ठरला त्याचे कारण म्हणजेच संघाची संपूर्ण सीजनमध्ये राहिलेली निराशाजनक फलंदाजी. या सीझनमध्ये चेन्नईच्या फलंदाजांनी अत्यंत निराश केले. त्याचबरोबर अनेक नव्या खेळाडूंना देखील संधी देण्यात आली.
चेन्नईचा कर्णधार ऋतुराज गायकवाड याला देखील दुखापत्रीमुळे स्पर्धा सोडावी लागली तसेच जागेवर आयुष म्हात्रे याला संघामध्ये स्थान मिळाले आणि त्याने चांगली कामगिरी केली. त्याचबरोबर डिव्होल्ड ब्रेविस, उर्विल पटेल यांसारख्या युवा खेळाडूंना चेन्नईच्या संघाने सामील केले आहे. चेन्नईच्या संघामध्ये आता कोणत्या खेळाडूंना स्थान मिळणार आणि कोणत्या खेळाडूंना रिलीज केले जाणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. आता चेन्नई सुपर किंग्सच्या संघाच्या संदर्भात मोठे अपडेट समोर आली आहे. चेन्नई सुपर किंग्सचा माजी खेळाडू सुरेश रैना याच्याकडे आयपीएल 2026 च्या संघाकडून मोठी जबाबदारी मिळणार आहे असे वृत्तांच्या माहितीनुसार समोर आले आहे.
BUZZ 🚨
SURESH RAINA SET TO RETURN AS BATTING COACH OF CHENNAI SUPER KINGS pic.twitter.com/VrsAdnn4wj
— CSK Fans Army™ (@CSKFansArmy) May 25, 2025
सोशल मीडियावर चर्चा सुरू झाले आहे की, आयपीएल 2020 मध्ये चेन्नई संघाचा बॅटिंग कोच हा सुरेश रैना असणार आहे. यासंदर्भात अजून पर्यंत अधिकृत माहिती फ्रॅंचाईजीने शेअर केलेली नाही.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जला आयुष म्हात्रे आणि डेव्हॉन कॉनवे यांनी दमदार सुरुवात करून दिली. दोघांनीही पहिल्या विकेटसाठी ४४ धावांची भागीदारी केली. आयुषने स्फोटक फलंदाजी केली आणि १७ चेंडूत ३४ धावा केल्या. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येत असताना, उर्विल पटेलनेही फलंदाजीने चांगली कामगिरी केली आणि १९ चेंडूत ३७ धावा केल्या. शिवम दुबे ८ चेंडूत १७ धावा करून बाद झाला. कॉनवे चांगल्या लयीत दिसला आणि त्याने ३५ चेंडूत ५२ धावा केल्या.
देवाल्ड ब्रेव्हिसने शेवटच्या षटकांमध्ये कहर केला आणि फक्त २३ चेंडूत ५७ धावांची धमाकेदार खेळी केली. जडेजाने १८ चेंडूत २१ धावा केल्या, ज्यामुळे सीएसकेने २० षटकांत ५ गडी गमावून २३० धावा केल्या. गोलंदाजीत गुजरातच्या प्रसिद्ध कृष्णाने दोन, तर रशीद खान आणि शाहरुखने प्रत्येकी एक विकेट घेतली.