फोटो सौजन्य - BCCI Domestic सोशल मिडिया
आजच्या पहिल्या डावामध्ये भारतीय संघाच्या फलंदाजीबद्दल सांगायचे झाले तर भारताच्या संघाने पहिला विकेट लवकर गमावला. अभिमन्यू ईश्वरन याने त्याची विकेट लवकर गमावली त्याने संघासाठी एकही धाव केली नाही. तर त्यानंतर साई सुदर्शन फलंदाजीला आला होता. त्याने देखील या सामन्यामध्ये फार काही चांगली कामगिरी केली नाही त्याने संघासाठी पहिल्या डावामध्ये फक्त 19 धावांची खेळी खेळली आणि विकेट गमावली. त्यानंतर लगेचच साई सुदर्शन देखील स्वतात बाद झाला.
Lunch break: India A – 85/4 in 23.6 overs (Dhruv Chand Jurel 19 off 21, Rishabh Pant 23 off 16) #INDAvSAA #IndiaASeries — BCCI Domestic (@BCCIdomestic) November 6, 2025
साई सुदर्शनने या सामन्यामध्ये देखील निराश केले, त्याने 17 धावा केल्या बाद झाला. मागील काही मालिकांमध्ये साई सुदर्शन याला भारतीय संघामध्ये त्याचबरोबर भारतीय अ संघामध्ये खेळण्याची संधी दिली जाते पण तो आतापर्यत फार काही प्रभावशाली कामगिरी करु शकला नाही. भारताच्या संघामधील चौथ्या स्थानावर आलेला फलंदाज देवदत्त पडिकल्ल देखील फेल ठरला. त्याने फक्त 5 धावा केल्या आणि विकेट गमावली. भारताच्या संघाने पहिल्या डावामध्ये फारच निराशाजनक कामगिरी केली आहे. टीम इंडिया दक्षिण आफ्रिका अ विरुद्ध एकदिवसीय मालिका देखील खेळताना दिसणार आहे.
दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजीबद्दल सांगायचे झाले तर तियान व्हॅन वुरेन याने संघाला दोन विकेट्स मिळवून दिले. त्याने दक्षिण आफ्रिकेसाठी केएल राहुल आणि देवदत्त पडिक्कल यांना बाहेरचा रस्ता दाखवला. तर त्शेपो मोरेकी याने इश्वरन याला बाद केले.






