घटनादुरुस्ती न केल्यामुळे रेंगाळलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फिफा (FIFA) या जागतिक फुटबॉल संस्थेकडून अखिल भारतीय फुटबॉल संघटनेला (AIFF) निलंबित करण्यात आले आहे. आता याच एआयएफएफच्या निवडणुकीची तारीख निश्चित करण्यात आली आहे. एआयएफएफच्या कार्यकारी समितीसाठीची निवडणूक २ सप्टेंबर रोजी पारपडणार असून याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून करण्यात आली आहे.
२३ ऑगस्ट रोजी झालेल्या निर्णयानुसार २ सप्टेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी गुरुवार २५ ऑगस्ट पासून इच्छुकांना अर्ज करता येणार आहे. हे अर्ज भरण्याची शेवटची तारीख शनिवारपर्यंत असणार आहे. २८ ऑगस्ट रोजी इच्छुकांनी भरलेल्या अर्जांची छाननी होऊन २९ ऑगस्ट रोजी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख असणार आहे. निवडणूक अधिकारी ३० ऑगस्ट रोजी उमेदवारांची अंतिम यादी जाहीर करतील.
२५ ऑगस्ट अर्थातच गुरुवारपासून इच्छुकांना अर्ज भरता येणार आहे. अर्ज भरण्याची मुदत शनिवारपर्यंत असणार आहे. एआयएफएफच्या नवी दिल्लीतील मुख्यालयात येत्या २ सप्टेंबरला निवडणूक घेतली जाईल. तसेच निवडणूक अधिकाऱ्यांच्या नुसार २ सप्टेंबर किंवा ३ सप्टेंबरला निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. निलंबन मागे घेण्याची फिफाकडे विनंतीसर्वोच्च न्यायालयाकडून सोमवारी निवडण्यात आलेली प्रशासकीय समिती भंग केली. एआयएफएफवर आता प्रशासकीय समितीचा अंकुश नसेल. तसेच एआयएफएफच्या दैनंदिन कामकाजावरही एआयएफएफच्या अधिकाऱ्यांचेच लक्ष असेल. यामुळे आता आमच्यावरील निलंबन मागे घ्या, अशा प्रकारची विनंती एआयएफएफचे प्रभारी सरचिटणीस सुनंदो धर यांनी फिफाचे सरचिटणीस फातम समौरा यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.