फोटो सौजन्य - SKY Sports
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये अँडरसन आणि तेंडुलकर ट्रॉफीला आजपासून सुरुवात होणार आहे. पतोडी ट्रॉफीचे नाव बदलून अँडरसन आणि तेंडुलकर ट्रॉफी असे देण्यात आले आहे काल त्याचे अनावरण झाले. पहिला सामना भारतीय वेळेनुसार दुपारी ३:३० वाजता लीड्समध्ये सुरू होईल. कसोटी क्रिकेट संघ एका नवीन अध्यायाला सुरुवात करणार आहे, बदलाच्या या टप्प्यात, शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया इंग्लंडचा सामना करण्यास सज्ज आहे. या मालिकेत ऋषभ पंत टीम इंडियाचा उपकर्णधार आहे, याशिवाय पंत फलंदाजीतही महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. दरम्यान, महान फलंदाज सचिन तेंडुलकरने पंतला गुरुमंत्र दिला आहे.
गोल्डन बॉय नीरज चोप्रा पुन्हा ॲक्शनमध्ये! येथे पाहू शकता मोफत लाईव्ह स्ट्रीमिंग
“मला माहित आहे की तो उर्वरित वेळेत जे काही करेल ते संघाच्या हिताचे असेल, परंतु दृष्टिकोन वेगळा असावा लागेल. त्याच्या मनात लवचिकता असावी लागेल. जर तुम्हाला सामना वाचवायचा असेल तर त्याला बचावात्मक दृष्टिकोन स्वीकारावा लागेल, उदाहरणार्थ एक तास किंवा ४५ मिनिटे किंवा कधीकधी दोन तास, जिथे त्याला धोकादायक फटक्यांना खेळापासून दूर ठेवावे लागेल आणि आक्रमक होऊ नये,” असे सचिन तेंडुलकरने ईएसपीएनने म्हटले आहे.
तो पुढे म्हणाला, “जर मी कर्णधार असेन तर दहा पैकी नऊ वेळा मी म्हणेन, ‘बस बाहेर जा आणि तुमचा खेळ खेळा, कशाची काळजी करायची.’ जर तुम्ही खेळ वाचवण्याचा विचार करत असाल, तर तोच वेळ असतो जेव्हा दृष्टिकोन थोडा बदलतो.”
Two cricketing icons. One special recognition 🤝
The legendary Sachin Tendulkar and James Anderson pose alongside the new 𝘼𝙣𝙙𝙚𝙧𝙨𝙤𝙣-𝙏𝙚𝙣𝙙𝙪𝙡𝙠𝙖𝙧 𝙏𝙧𝙤𝙥𝙝𝙮 🏆#TeamIndia | #ENGvIND | @sachin_rt | @jimmy9 pic.twitter.com/4lDCFTud21
— BCCI (@BCCI) June 19, 2025
या मालिकेत ऋषभ पंत पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसला. इंग्लंडमध्ये पंतची आकडेवारीही उत्कृष्ट आहे. आतापर्यंत पंतने इंग्लंडच्या भूमीवर ९ कसोटी सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याच्या बॅटमधून ५५६ धावा आल्या आहेत. याशिवाय पंतने इंग्लंडमध्ये २ शतके आणि २ अर्धशतके झळकावली आहेत. आता इंग्लंडमध्ये पंतची भूमिका खूप महत्त्वाची असणार आहे, तो अनेकदा कसोटी क्रिकेटमध्ये निर्भयपणे खेळताना दिसतो, परंतु या प्रक्रियेत अनेक वेळा पंत वाईट शॉट खेळून बाद होतो. अशा परिस्थितीत, यावेळी पंतला त्याच्या फलंदाजीत थोडे काळजीपूर्वक खेळण्याची आवश्यकता आहे.