फोटो सौजन्य : X
MS Dhoni – भारतामध्ये अनेक कॅप्टन्स झाले आहेत यामध्ये काय मोजकेच आहेत ज्यांनी भारताच्या संघाला आयसीसी ट्रॉफी जिंकून दिल्या आहेत. महेंद्रसिंग धोनी हा भारतीय क्रिकेट इतिहासामध्ये सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून त्याची गणना केली जाते. महेंद्रसिंग धोनीने जे केले आहे ते आत्तापर्यंत भारतीय क्रिकेटसाठी कोणत्याही कर्णधाराने त्याच्या कॅप्टनसी मध्ये करून दाखवलेले नाही. बऱ्याचदा महेंद्रसिंह धोनी याला तो क्रेडिट घेतो यामुळे ट्रोल केले जाते पण त्याने जी कामगिरी भारतीय क्रिकेटसाठी केले आहे ती अजून पर्यंत कोणत्याही कर्णधाराने करून दाखवलेली नाही.
आता आयसीसीने म्हणजेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट बोर्डाने त्याला 12 वर्षानंतर सन्मानित केले आहे. क्रिकेटची सर्वात मोठी संस्था आयसीसी हॉल ऑफ द फेम यामध्ये महेंद्रसिंग धोनी हा सामील करण्यात आला आहे. धोनीच्या व्यतिरिक्त इतर खेळाडूचा देखील यामध्ये समावेश करण्यात आला आहे.
भारताच्या संघाने 2007 मध्ये पहिल्यांदाच खेळला गेलेला t20 विश्वचषक यावेळी भारताच्या कोणत्याही क्रिकेट चाहत्याला त्याची अपेक्षा नव्हती युवा खेळाडूंसह युवा कर्णधार असताना भारताच्या संघाने हा विश्वचषक जिंकला होता. त्यानंतर 2011 मध्ये भारताच्या संघाने घरच्या मैदानावर एकदिवसीय विश्वचषक जिंकला. तर 2 वर्षानंतर चॅम्पियन ट्रॉफी देखील नावावर केली होती. महेंद्रसिंग धोनी यांनी 2020 मध्ये त्याने निवृत्तीची घोषणा केली होती.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप सुरू होण्यापूर्वी महेंद्रसिंग धोनी याला आयसीसी फेम ऑफ द हॉल यामध्ये सामील करण्यात आले आहे. भारताच्या कर्णधारासह इतर विदेशी खेळाडूंना देखील यामध्ये सामील करण्यात आले आहे. ऑस्ट्रेलियन महान सलामीवीर खेळाडू मॅथ्यू हेडन आणि न्युझीलँडचा महान फिरकी गोलंदाज डॅनियम विक्टरी याला सामील करण्यात आले आहे. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेचा हाशिम आमला आणि महान कर्णधार ग्रॅमी स्मिथ यांच्या नावाचा देखील समावेश आहे.
Unorthodox, unconventional and effective 🙌
A cricketer beyond numbers and statistics 👏
MS Dhoni is inducted in the ICC Hall of Fame 🥇
More ➡️ https://t.co/oV8mFaBfze pic.twitter.com/AGRzL0aP79
— ICC (@ICC) June 9, 2025
भारताच्या क्रिकेट विश्वामध्ये आत्तापर्यंत 11 खेळाडूंना हा सन्मान देण्यात आला आहे. महेंद्रसिंग धोनी च्या आधी महिला क्रिकेट खेळाडू नीतू डेव्हिड, वीरेंद्र सेहवाग, डायना अडूलजी, विनू मंकड, राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर, अनिल कुंबळे, कपिल देव, बिशन सिंग बेदी आणि सुनील गावस्कर या भारतीय खेळाडूंना आयसीसी हॉल ऑफ द फेम येथे सामील करण्यात आले होते.