फोटो सौजन्य - BCCI
ऋषभ पंत – शुभमन गिल : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये 20 जूनपासून पाच सामनांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. शुभमन गिल हा भारतीय संघाची कमान सांभाळणार आहे तर ऋषभ पंत हा त्याची साथ देणार आहे. भारताचे दोन्ही युवा खेळाडूंकडे भारतीय संघाची कमान देण्यात आली आहे. हॅरी ब्रुक याच्याकडे इंग्लंडची कमान असणार आहे. या मालिकेआधी भारतीय उपकर्णधार रिषभ पंत याची पत्रकार परिषद पार पडली. यामध्ये अनेक कठीण पत्रकारांच्या प्रश्नांवर उत्तर दिले आहेत. यामध्ये त्याने त्याच्या आणि शुभमन गिल याच्या नात्याबद्दल देखील मोठा खुलासा केला आहे.
IND vs ENG: लीड्स कसोटीची खेळपट्टी कुणाला जाणार शरण? फलंदाज की गोलंदाज? गूढ उमगले; वाचा सविस्तर..
भारत विरुद्ध इंग्लंड मालिका सुरू होण्याआधी रिषभ पंत याची पत्रकार परिषद पार पडली यामध्ये तो शुभमन गिल आणि त्याच्या नात्यावर त्याने विधान केले आहे आणि तो म्हणाला की माझा आणि शुभमन आणि याचं नातं मैदानाबाहेर फारच चांगल आहे. जर तुमचं नातं हे मैदाना बाहेर चांगलं असेल तर ते आपोआप मैदानावरही चांगलं राहतं आणि ते क्रिकेटसाठी सुद्धा चांगलंच आहे असं ऋषभ पंत म्हणाला. पुढे ऋषभ पंत म्हणाला की माझा विश्वास आहे की माझं विकेट किपर म्हणून आणि आमचं नातं मजबूत असल्यामुळे ते खूप आमच्यासाठी खास आहे असे ऋषभने स्पष्ट केले.
भारतीय संघ पहिला सामना हा 20 जून रोजी खेळणार आहे. हा सामना यॉर्कशिरे क्रिकेट ग्राउंड या मैदानावर खेळवला जाणार आहे. इंग्लंडचे कर्णधारपद हे बेन स्टोक्स याच्याकडे असणार आहे. भारतीय संघ आयपीएल 2025 झाल्यानंतर या लगेचच सरावासाठी इंग्लंडला रवाना झाली होती. मागील बरेच दिवस संघ येथे सराव करत आहे.
Vice-captain 🤝 Captain #TeamIndia | #ENGvIND | @RishabhPant17 | @ShubmanGill pic.twitter.com/xrQLUmemC8
— BCCI (@BCCI) June 18, 2025
आता भारताचा संघ इंग्लंडचे आव्हान कसे स्वीकारेल पाहणे महत्त्वाचे ठरेल. इंग्लंडच्या संघामध्ये देखील अनेक नव्या खेळाडूंना संधी मिळाले आहे. भारत विरुद्ध इंग्लड मालिकेसाठी संघाचे भारताचा स्क्वाड खालीलप्रमाणे.
शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (विकेटकिपर/उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यू इसवरन, करुण नायर, नितीश रेड्डी, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (विकेटकिपर), वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, सिराज, प्रसीध्द कृष्णा, आकाश दीप, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, हर्षित राणा