फोटो सौजन्य - EuropeanCricket सोशल मीडिया
आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमधील सर्वात जलद शतक : भारताचा संघाची नुकतीच T२० मालिका पार पडली आहे. यामध्ये भारताच्या संघाने ही मालिका ४-१ अशी जिंकली. यामध्ये टीम इंडियाच्या फलंदाजांनी मैदानावर कहर केला होता. शेवटचा सामना वानखेडे स्टेडियमवर झाला आणि या मैदानावर धावांचा पाऊस आणि प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन देखील भारतीय संघाने केले. रविवार, २ फेब्रुवारी रोजी, मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या सामन्यात अभिषेक शर्माने ३७ चेंडूत शतक झळकावून खळबळ उडवून दिली.
फॉर्ममध्ये परतण्याबाबत सूर्यकुमारला अश्विनकडून ‘खास’ सल्ला, इंग्लंडविरुद्ध मालिकेत कॅप्टन फेल
आपल्या धडाकेबाज फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेल्या अभिषेक शर्माबद्दल खूप चर्चा होत आहे, सोशल मीडियावर त्याने केलेल्या फलंदाजीचे व्हिडीओ वाऱ्यासारखे व्हायरल होत आहेत. परंतु टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील विश्वविक्रम असलेल्या साहिल चौहानच्या शतकाबद्दल तुम्हाला माहिती झाल्यावर अभिषेक शर्माचे हे वादळी शतक कंटाळवाणे वाटेल.
खरं तर, टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक ठोकण्याचा विश्वविक्रम भारतीय वंशाच्या साहिल चौहानच्या नावावर आहे, ज्याने गेल्या वर्षी जूनमध्ये फक्त २७ चेंडूत शतक ठोकले होते. त्याने ३५१.२१ च्या स्ट्राईक रेटने तुफानी शतक झळकावले. त्याने त्याच्या संपूर्ण डावात १८ षटकार आणि ६ चौकारही मारले. हा सामना मोठ्या संघांमधील नव्हता, परंतु आयसीसीच्या नियमांनुसार, जेव्हा दोन देश एकमेकांसमोर येतात तेव्हा त्यांना टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्याचा दर्जा दिला जातो. अशा परिस्थितीत हा विश्वविक्रम साहिल चौहानच्या नावावर आहे.
हा सामना १७ जून २०२४ रोजी एस्टोनिया आणि सायप्रस यांच्यात खेळला गेला. या सामन्यात एस्टोनियाकडून खेळताना, हरियाणातील पिंजोर येथे जन्मलेल्या साहिल चौहानने ४१ चेंडूत १४४ धावा केल्या. या डावात त्याने १८ षटकार मारले. हा स्वतःच एक विक्रम होता, कारण त्याने फक्त षटकार मारून त्याचे शतक पूर्ण केले. साहिल चौहान हे युरोपियन क्रिकेटमधील एक मोठे नाव आहे. तो २०० पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने धावा करतो.
Estonia’s Sahil Chauhan scored the fastest T20I ton off just 27 balls against Cyprus.
He smashed 144 runs in just 41 balls 🤯. It was also the fastest T20 ton 👏
📸: @EuropeanCricket pic.twitter.com/Iulf86kAFJ
— The sports (@the_sports_x) June 18, 2024
१. साहिल चौहान – २७ चेंडू
२. जेन निकोल लॉफ्टी-ईटन – ३३ चेंडू
३. सिकंदर रझा – ३३ चेंडू
४. कुसल मल्ला – ३४ चेंडू
५. रोहित शर्मा – ३५ चेंडू
६. डेव्हिड मिलर – ३५ चेंडू
७. सुदेश विक्रमशेखरा – ३५ चेंडू
८. अभिषेक शर्मा – ३७ चेंडू