फोटो सौजन्य – X
मेजर क्रिकेट लीग सध्या सुरु आहे, यामध्ये सहा संघ सहभागी झाले आहेत. या स्पर्धेमध्ये अनेक आंतरराष्ट्रीय स्तरावरुन दिग्गज खेळाडू सामील झाले आहेत. पहिल्या सामन्यात अनेक रेकाॅर्ड नोंदवण्यात आले होते. निकलस पुरन याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधुन निवृती घेतली आहे, त्यानंतर त्याला आता एमआय न्युऑर्कचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. तर टेक्सास सुपर किंग्सचे कर्णधारपद हे फाफ डूप्लेसीकडे सोपवण्यात आले आहे. फाफ डूप्लेसी हा त्याच्या वयाच्या 40 व्या वर्षी देखील क्रिकेट खेळत आहे.
आयपीएल २०२५ मध्ये अपयशी ठरल्यानंतर, फाफ डू प्लेसिस मेजर लीग क्रिकेट २०२५ मध्ये धमाल करत आहे. ४० वर्षांच्या वयातही, फाफ डू प्लेसिस २१-२२ वर्षांच्या क्रिकेटपटूइतकाच चपळ आहे. टेक्सास सुपर किंग्ज विरुद्ध सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्स या दोन संघामध्ये झालेल्या सामन्यामध्ये फाफ डू प्लेसिसने दमदार फलंदाजी करताना शतक झळकावले, पण तो संघाला विजयापर्यत नेऊ शकला नाही. फाफच्या फलंदाजीने आणखी एकदा चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना टेक्सास सुपर किंग्जने २० षटकांत ५ गडी गमावून १९८ धावा केल्या. यादरम्यान, फाफने शतक झळकावले, त्याने फलंदाजी करताना ५१ चेंडूत १०० धावा केल्या. त्याच्या डावात फाफने ६ चौकार आणि ७ षटकार मारले. यादरम्यान, त्याचा स्ट्राईक रेट १९६.०८ होता. फलंदाजीव्यतिरिक्त, फाफ मेजर लीग क्रिकेटमध्ये त्याच्या क्षेत्ररक्षणानेही सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
Faf smashes his first century of the 2025 MLC season 💯 pic.twitter.com/1jq1w5mluD
— Cognizant Major League Cricket (@MLCricket) June 21, 2025
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना टेक्सास सुपर किंग्जने सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्सना विजयासाठी १९९ धावांचे लक्ष्य ठेवले होते, जे सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्सने १६.१ षटकात ३ गडी गमावून पूर्ण केले. सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्सकडून फलंदाजी करताना फिन अॅलनने ३५ चेंडूत सर्वाधिक ७८ धावा केल्या. ज्यामध्ये त्याच्या बॅटमधून ८ षटकार आणि ४ चौकार आले.
नशीबाचा खेळ! ऐकमेकांना आपटले, गोंधळले पण आऊट झाले नाही, MPL 2025 मध्ये काहीतरी नवीनच…Video Viral
याशिवाय मॅथ्यू शॉर्टने २९ चेंडूत ६१ धावा केल्या, ज्यामध्ये ६ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश होता. जॅक फ्रेझरने २५ चेंडूत ३ चौकार आणि २ षटकारांसह ३७ धावा केल्या. त्यामुळे सॅन फ्रान्सिस्कोने हा सामना ७ विकेट्सने जिंकला. यापूर्वी, सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्सकडून गोलंदाजी करताना झेवियर बार्टलेट आणि हॅरिस रौफ यांनी प्रत्येकी २-२ विकेट्स घेतल्या.