फोटो सौजन्य – X (Cricbuzz)
मेजर क्रिकेट लीग सध्या सुरु आहे, यामध्ये आज टेक्सास सुपर किंग्स विरुद्ध एमआय न्युऑर्क यांच्यामध्ये सामना पार पडला. आयपीएल २०२५ संपल्यानंतर अमेरिकेत टी-२० क्रिकेटचा धुमाकूळ सुरू आहे. मेजर क्रिकेट लीग २०२५ मध्ये जगातील अनेक मोठे खेळाडू चमकत आहेत. या लीगमध्ये फाफ डू प्लेसिसची बॅट धमाकेदार आहे. टेक्सास सुपर किंग्ज आणि एमआय न्यू यॉर्क यांच्यात झालेल्या सामन्यात त्याने तुफानी फलंदाजी करताना शतक झळकावले. या सामन्यात त्याने ५३ चेंडूंचा सामना करत १०३ धावांची धमाकेदार खेळी केली. या खेळीच्या जोरावर प्लेसिसने एक मोठा विक्रमही आपल्या नावावर केला आहे. या खास विक्रमाबद्दलही आपण तुम्हाला सांगूया.
मेजर क्रिकेट लीगच्या इतिहासात फाफ डू प्लेसिसचे हे तिसरे शतक आहे. यासह, तो लीगमध्ये ही कामगिरी करणारा पहिला खेळाडू बनला आहे. तसेच, या हंगामात त्याचे हे दुसरे शतक आहे. यापूर्वी, फ्रान्सिस्को युनिकॉर्न विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात त्याने वादळी खेळी करत शतक झळकावले होते. त्याच्याशिवाय, आतापर्यंत या लीगमध्ये इतर कोणताही खेळाडू 3 शतके झळकावू शकलेला नाही. निकोलस पूरन आणि फिन अॅलन यांच्या नावावर प्रत्येकी 2 शतके आहेत.
प्लेसिस आयपीएल २०२५ मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा भाग होता. या हंगामात त्याची बॅट चांगल्या फॉर्ममध्ये नव्हती पण मेजर क्रिकेट लीगमध्ये पोहोचताच त्याच्या बॅटने आग ओकायला सुरुवात केली. या हंगामात त्याने टेक्सास सुपर किंग्जकडून खेळलेल्या ७ सामन्यांमध्ये ३१७ धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याची सरासरी ५२.८३ आहे तर त्याचा स्ट्राइक रेट १८० च्या जवळपास आहे.
🚨 HUNDRED FOR CAPTAIN FAF DU PLESSIS 🚨
– TSK Captain smashed 100 from just 51 balls including including 6 fours & 7 sixes at the age of 40 in MLC 👑
A LEGEND OF SUPER KINGS FRANCHISE…!!! pic.twitter.com/4wGhGpfHbt
— Johns. (@CricCrazyJohns) June 21, 2025
या सामन्यात टेक्सास सुपर किंग्जकडून फाफ डु प्लेसिससोबत डोनोवन फरेरा यांनीही वादळी खेळी केली. त्याने २० चेंडूंचा सामना करत ५२ धावा केल्या. या खेळीदरम्यान त्याचा स्ट्राईक रेट २६५ होता आणि त्याने ३ चौकार आणि ५ षटकार मारले. दोन्ही खेळाडूंच्या वादळी खेळीच्या जोरावर सुपर किंग्जने २० षटकांत ४ गडी गमावून २२३ धावा केल्या.