फोटो सौजन्य - Mumbai Indians/Chennai Super Kings सोशल मीडिया
Mumbai Indians vs Chennai Super Kings : आज आयपीएल २०२५ मधील पहिला सुपर संडे आहे, जिथे चाहत्यांना सामन्यांचा डबल डोस मिळणार आहे. आज म्हणजेच रविवार, २३ मार्च रोजी एक नाही तर दोन सामने खेळवले जाणार आहेत. एका सामन्यात, रोहित शर्मा आणि महेंद्रसिंग धोनीचे संघ एकमेकांसमोर असणार आहेत. आजचा दुसरा सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यामध्ये खेळवला जाणार आहे तर पहिला सामना सनराईझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यामध्ये होणार आहे. मुंबई आणि चेन्नईच्या या दोघांनीही प्रत्येकी पाच वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. तथापि, यावेळी दोन्ही कर्णधार तिथे नाहीत.
दोघांनीही गेल्या हंगामात कर्णधारपद सोडले होते. दुसऱ्या सामन्यात, आयपीएलच्या पहिल्या हंगामातील विजेते २०१६ हंगामातील विजेत्या संघाशी भिडतील. चेन्नईचा संघ ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात मैदानात उतरेल तर मुंबई इंडियन्सचा संघ पहिला सामान सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात पहिला सामना खेळणार आहे. कारण आयपीएल २०२४ मध्ये हार्दिक पंड्याला स्लोओव्हरमुले एक मॅच बॅन करण्यात आले आहे. आयपीएल २०२५ चा दुसरा सामना आणि सुपर संडेचा पहिला सामना सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळला जाईल. दिवसाचा दुसरा सामना आणि स्पर्धेतील तिसरा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळला जाईल.
FIRST BATTLE! BEST BATTLE!🤜💥🤛#CSKvMI #WhistlePodu #Yellove🦁💛 pic.twitter.com/VMBqi4o7UU
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) March 23, 2025
हैदराबाद विरुद्ध राजस्थान सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाईल, तर सीएसके विरुद्ध एमआय सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला जाईल. याला आयपीएलचा एल क्लासिको म्हणतात. दोन्ही संघ या स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ आहेत. आयपीएल २०२५ चा एसआरएच विरुद्ध आरआर सामना भारतीय वेळेनुसार दुपारी ३:३० वाजता सुरू होईल, तर टॉस दुपारी ३ वाजता होईल. त्याच वेळी, सीएसके विरुद्ध एमआय सामना संध्याकाळी ७.३० वाजता सुरू होईल आणि टॉस संध्याकाळी ७ वाजता होईल.
आज होणाऱ्या दोन सामन्यांमध्ये खेळणाऱ्या चार संघांनी गेल्या १७ हंगामात एकूण १२ ट्रॉफी जिंकल्या आहेत. चेन्नई आणि मुंबईनेच १० ट्रॉफी जिंकल्या आहेत. अशा परिस्थितीत, आजचे सामने खूप रंजक असणार आहेत. पहिल्या काही सामन्यांमध्ये राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व रियान पराग करेल. संजू सॅमसन फक्त फलंदाज म्हणून खेळेल. आयपीएलच्या पहिल्या सामन्यात कोलकाता आणि बंगळुरू यांच्यात सामना झाला, ज्यामध्ये आरसीबीने शानदार विजय मिळवला. विराट कोहलीने अर्धशतकी खेळी केली.