फोटो सौजन्य - RevSportz Global सोशल मीडिया
IPL 2025 first Match KKR vs RCB : कालपासून आयपीएल २०२५ ला सुरुवात झाली आहे, या आयपीएल २०२५ सीझन-१८ च्या सिझनची सुरुवात मोठ्या यशाने झाली आहे. पहिला सामना गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळला गेला. पहिल्या सामन्यात, रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली आरसीबीने शानदार विजय मिळवला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाने कोलकाता नाईट राइडर्सला ७ विकेट्सने पराभूत केले. सामन्यात आरसीबीकडून स्फोटक फलंदाजी दिसून आली. पहिल्या सामन्यातील पराभवानंतर केकेआरचा कर्णधार अजिंक्य रहाणे यांचे एक विधानही समोर आले आहे ज्यामध्ये त्यांनी संघ कुठे चुकला हे सांगितले.
IPL 2025 : किंग कोहलीने कोलकाता नाईट राइडर्सच्या गोलंदाजांना धुतलं, सॉल्टचं अर्धशतक! आरसीबीने केला केकेआरचा 7 विकेट्सने पराभव
कालच्या सामन्यांमध्ये कोलकाता नाईट राइडर्सचा कर्णधार अजिंक्य राहणे संघासाठी कमालीची फलंदाजी केली पण तो संघाला विजयापर्यत नेऊ शकला नाही. आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर कर्णधार अजिंक्य रहाणे म्हणाला, “मला वाटले की आम्ही १३ व्या षटकापर्यंत चांगले खेळत होतो, परंतु २-३ विकेट पडल्यानंतर आमची लय बदलली. त्यानंतर फलंदाजांनी त्यांचे सर्वोत्तम प्रयत्न केले, पण आम्हाला यश मिळू शकले नाही. जेव्हा मी आणि वेंकी फलंदाजी करत होतो, तेव्हा आम्ही चर्चा करत होतो की २००-२१० धावांचा आकडा गाठता येईल, परंतु त्या विकेटमुळे आमची लय बदलली.”
रहाणे पुढे म्हणाला, “थोडा दव पडला होता, पण त्यांनी फलंदाजीने खूप चांगला पॉवरप्ले खेळला. तो सरासरीपेक्षा कमी होता. आम्हाला २००+ धावांची अपेक्षा होती. आम्हाला या सामन्याबद्दल जास्त विचार करायचा नाही, परंतु त्याच वेळी काही क्षेत्रांमध्ये चांगले प्रदर्शन करण्याचा प्रयत्न करू.”
Ajinkya Rahane press conference:
It’s hard to pin point a certain things. This a first game. As a team, we did really well in the few areas. RCB bowled really well. First three overs were really good. It didn’t work out for us. I hope you all enjoyed my batting. pic.twitter.com/RKQbM6GPrZ
— RevSportz Global (@RevSportzGlobal) March 22, 2025
या सामन्यात केकेआरने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ८ गडी गमावून १७४ धावा केल्या. केकेआरकडून कर्णधार अजिंक्य रहाणेने सर्वाधिक ५६ धावांची खेळी केली. त्यानंतर आरसीबीने १६.२ षटकांत ३ गडी गमावून हे लक्ष्य सहज गाठले. आरसीबीकडून फलंदाजी करताना विराट कोहलीने ५९ धावांची नाबाद खेळी केली.
कोलकाता नाईट राइडर्सचा पुढील सामना २६ मार्च रोजी होणार आहे, हा सामना केकेआर विरुद्ध आरआर यांच्यामध्ये खेळावला जाणार आहे. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाचा पुढील सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध खेळवला जाणार आहे. हा सामना २८ मार्च रोजी होणार आहे.