फोटो सौजन्य - X
PSL 2025 : भारतामध्ये सध्या इंडीयन प्रिमियर लिग सुरू आहे, यामध्ये सर्व संघ सध्या प्लेऑफच्या शर्यतीत जाण्यासाठी व्यस्त आहेत. याचदरम्यान भारत – पाकिस्तान यांच्यामध्ये तणावाचे वातावरण सुरू आहे. शेजारच्या देशामध्ये देखील पीएसएल सुरू आहे. PSL म्हणजेच पाकिस्तान सुपर लिग. PSL 2025 सध्या पाकिस्तानमध्ये खेळले जात आहे. ज्यामध्ये अनेक परदेशी खेळाडू देखील खेळत आहेत. त्याच वेळी, भारताने पाकिस्तान आणि पीओकेमध्ये केलेल्या हवाई हल्ल्यानंतर, पीएसएलमध्ये खेळणारे परदेशी खेळाडू घाबरले आहेत. त्यानंतर आता काही परदेशी खेळाडू पीएसएल सोडू इच्छितात अशा बातम्या येत आहेत.
भारताने केलेल्या हवाई हल्ल्यानंतर, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने पीएसएल सामने नियोजित वेळापत्रकानुसार खेळवले जातील याची पुष्टी केली होती. तथापि, आता इंग्लंडमधील काही खेळाडू याबद्दल चिंतेत आहेत आणि पीएसएल सोडू इच्छितात. सॅम बिलिंग्ज, जेम्स विन्स, टॉम करन, डेव्हिड विली, ख्रिस जॉर्डन, टॉम कोहलर-कॅनमोर आणि ल्यूक वूड हे इंग्लंडचे खेळाडू पीएसएलमध्ये खेळत आहेत. अहवालानुसार, डेव्हिड विली आणि ख्रिस जॉर्डन यांनी मुलतान सुल्तान्सला सांगितले आहे की ते पीएसएल सोडू इच्छितात कारण त्यांचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतूनही बाहेर पडला आहे आणि संघाचा फक्त एक लीग सामना शिल्लक आहे.
With Multan Sultans out of PSL playoff contention, David Willey & Chris Jordan reportedly wish to return home amid rising India-Pakistan tensions ✈️🏴 pic.twitter.com/YU6TZDvQKM
— CricketGully (@thecricketgully) May 8, 2025
इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड आणि प्रोफेशनल क्रिकेटर्स असोसिएशन खेळाडूंच्या संपर्कात असल्याचे वृत्त आहे, तथापि, त्यांनी अद्याप खेळाडूंना देश सोडण्याचे निर्देश दिलेले नाहीत. २२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी निष्पाप पर्यटकांना लक्ष्य करून त्यांची हत्या केली. त्यानंतर संपूर्ण भारतात पाकिस्तानविरुद्ध संताप दिसून आला. आता भारताने पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हवाई हल्ले करून योग्य प्रत्युत्तर दिले.
आज आयपीएल 2025 चा 58 वा सामना खेळवला जाणार आहे. हा सामना पंजाब किंग्स विरूध्द दिल्ली कॅपिट्ल्स यांच्यामध्ये सामना खेळवला जाणार आहे. आजच्या सामन्यात जर पंंजाबच्या संघाने विजय मिळवल्यास संघ प्लेऑफमध्ये एंन्ट्री करेल.तर दुसरीकडे आजच्या सामन्यात दिल्लीचा संघ पराभूत झाला तर संघाच्या प्लेऑफ आशा कमी होतील. जर संघाने सामना जिंकला तर प्लेऑफमध्ये कायम राहतील. त्यामुळे आजच्या सामन्यावर चाहत्यांची नजर असणार आहे. हा सामना धर्मशाला येथे होणार आहे.