फोटो सौजन्य - England Cricket
टिम साउदी : भारत विरूद्ध इंग्लड यांच्यामध्ये 20 जूनपासुन कसोटी मालिकेला सुरूवात होणार आहे. भारताचा संघ नवा कर्णधारासह इंग्लड दौऱ्यावर जाणार आहे. यासाठी भारताच्या संघाची कसोटी मालिकेसाठी अजूनपर्यत घोषणा केली नाही. त्याआधी इंग्लड बोर्डाने भारताविरूद्ध मास्टरप्लान तयार केला आहे. भारताविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेपूर्वी इंग्लंडने एक मोठी खेळी केली आहे. सर्वाधिक विकेट्स घेणारा न्यूझीलंडचा माजी वेगवान गोलंदाज टिम साउथीने इंग्लंडच्या संघात प्रवेश केला आहे.
सौदीला विशेष कौशल्य सल्लागार म्हणून संघात समाविष्ट करण्यात आले आहे. माजी किवी वेगवान गोलंदाज इंग्लंडच्या गोलंदाजी आक्रमणात धार वाढवण्यासाठी काम करेल. झिम्बाब्वेविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी सौदी संघात सामील होईल. तिन्ही फॉरमॅटसाठी सौदीला ही जबाबदारी देण्यात आली आहे.
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेले न्यूझीलंडचा माजी वेगवान गोलंदाज टिम साउथी यांना इंग्लंड क्रिकेट बोर्डाने नवीन जबाबदारी सोपवली आहे. सौदीला स्पेशल स्किल कन्सल्टंट म्हणून इंग्लिश संघात समाविष्ट करण्यात आले आहे, जिथे तो त्याच्या अनुभवाने तिन्ही फॉरमॅटमध्ये इंग्लंडच्या गोलंदाजी आक्रमणाला बळकटी देईल.
Our new Specialist Skills Consultant 😍
We’re delighted to announce that Tim Southee, New Zealand’s all-time leading wicket-taker, is joining us on a short-term basis.
Read more 👇
— England Cricket (@englandcricket) May 15, 2025
सौदीचा कार्यकाळ फार काळ ठेवण्यात आलेला नाही आणि तो भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेपर्यंतच या भूमिकेत दिसणार आहे. सौदीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खूप अनुभव आहे. झिम्बाब्वेविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी सौदी इंग्लिश संघात सामील होणार आहे. ब्रेंडन मॅक्युलम हे तिन्ही फॉरमॅटमध्ये इंग्लंडचे मुख्य प्रशिक्षक आहे आणि सौरभसोबत ते इंग्लंडच्या गोलंदाजी आक्रमणाला बळकटी देतील.
भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेची सुरूवात २० जूनपासून होणार आहे. मालिकेतील पहिल्या सामन्याचे आयोजन लीड्समध्ये करण्यात आले आहे, तर दुसरा सामना एजबॅस्टनमध्ये २ जुलैपासून सुरू होणार आहे. मालिकेतील तिसरा कसोटी सामना १० जुलैपासून लॉर्ड्सच्या मैदानावर रंगणार आहे. चौथा कसोटी सामना मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर होणार आहे. मालिकेतील शेवटचा कसोटी सामना ३१ जुलैपासून ओव्हल मैदानावर खेळला जाणार आहे.