फोटो सौजन्य - BCCI
WTC final 2025 prize money : दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल रंगणार आहे. त्यामुळे या दोन संघांना तर कोट्यावधी रुपये मिळणार तर आहेतच. उर्वरित जे संघ पॉइंट टेबलच्या चांगल्या रँकिंगमध्ये आहे त्यांनाही मोठी बक्षीस रक्कम देण्यात येणार आहे. आयसीसीचे अध्यक्ष जय शहा यांनी दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या दोघांना म्हणजेच उपविजेता आणि विजेता संघाला किती बक्षीस रक्कम दिली जाणार आहे याची घोषणा केली आहे. त्याचबरोबर आयसीसी डब्ल्यूटीसीच्या रँकिंगमध्ये असलेल्या संघांना देखील बक्षीस म्हणून काही रक्कम देण्यात येणार आहे.
आयसीसीने २०२५ च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी विक्रमी किंमत जाहीर केली आहे. अंतिम सामन्याची एकूण बक्षीस रक्कम $५.७६ दशलक्ष असेल. हे गेल्या दोन वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल्सच्या 2023 आणि 2021 च्या बक्षीस रकमेच्या दुप्पट आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल जिंकणाऱ्या संघाला $3.6 दशलक्ष म्हणजेच सुमारे 30 कोटी बक्षीस रकम दिली जाणार आहे.
IND vs ENG : इंग्लड दौऱ्याआधी भारताच्या प्रशिक्षकाने घेतले गणरायाचे दर्शन! कुटुंबासह केली पूजा
2021 आणि 2023 मध्ये विजेत्या संघाला १.६ दशलक्ष डॉलर्सची बक्षीस रक्कम देण्यात आली. उपविजेत्या संघाला २.१ दशलक्ष डॉलर्स सुमारे १८ कोटी रुपये मिळतील. भारतीय संघ तिसऱ्या स्थानावर राहिला आहे, अशा परिस्थितीत संघाला १२ कोटी ३३ लाख रुपये मिळतील. नवव्या स्थानावर असलेल्या पाकिस्तानच्या संघाच्या हाती ४ कोटी ११ लाख रुपये लागणार आहेत.
“दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील #WTC25 फायनलचा विजेता $3.6 दशलक्ष घेऊन जाणार आहे, तर उपविजेता $2.1 दशलक्ष घेऊन जाईल हे जाहीर करताना खूप आनंद होत आहे,” असे जय शाह यांनी X वर लिहिले. बक्षीस रकमेतील वाढ ही कसोटी क्रिकेटला प्राधान्य देण्याच्या आणि मागील WTC सायकलमधून मिळालेली गती राखण्याच्या आमच्या प्रयत्नांना प्रतिबिंबित करते.
It’s exciting to announce that the winner of the #WTC25 Final between South Africa and Australia will earn $3.6M, with the runner-up to receive $2.1M. The increase in prize money exhibits our efforts to prioritize Test cricket and build on momentum from previous WTC cycles. @ICC pic.twitter.com/GMgWxM7GSb
— Jay Shah (@JayShah) May 15, 2025
न्यूझीलंडचा संघ WTC फायनलच्या रॅकिंगमध्ये चौथ्या स्थानावर आहे. न्यूझीलंडच्या संघाला १०.२८ कोटी रूपये मिळाले आहे. पाचव्या स्थानावर इंग्लंडचा संघ आहे, यामध्ये इंग्लंडला ८.२२ कोटी रूपये मिळाले आहेत. श्रीलंकेचा संघ सहाव्या स्थानावर आहे, त्याना यांचे ७.१९ कोटी रूपये मिळाले. बांगलादेशचा संघ सातव्या स्थानावर आहे त्यांना ६.१७ कोटी मिळाले. आठव्या स्थानावर वेस्ट इंडीज आहे, वेस्ट इंडीजच्या संघाला ५.१४ कोटी रूपये मिळाले.