फोटो सौजन्य - X
गौतम गंभीर : भारताचा संघ पुढील महिन्यामध्ये इंग्लड दौऱ्यावर असणार आहे. यासाठी बीसीसीआय लवकरच भारताच्या नव्या कर्णधाराची घोषणा करेल. कारण भारताचा कर्णधार रोहीत शर्मा याने कसोटी क्रिकेटला अलविदा केला आहे. त्याचबरोबर विराट कोहलीने देखील कसोटी क्रिकेटमधून निवृतीची घोषणा केली आहे. भारताचा नवा कर्णधार कोण असणार आहे यावर अजूनही प्रश्नचिन्हच आहे. 2025 च्या आयपीएल संपल्यानंतर, भारतीय संघ इंग्लंडचा दौरा करेल. या दौऱ्यात दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामने खेळवले जातील.
या मालिकेसह भारतीय संघ नवीन जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची सुरुवात करेल. अशा परिस्थितीत, टीम इंडियाला नवीन चक्राची एक उत्तम सुरुवात करायची आहे. मालिकेपूर्वी भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आपल्या कुटुंबासह मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात पोहोचले. सिद्धिविनायक मंदिरामध्ये त्यांनी परिवारासोबत पूजा केली, गंभीरच्या कोचिंगखाली भारतीय संघाने कसोटी सामन्यांमध्ये कामगिरी निराशाजनक राहिलेली आहे. 2024-25 च्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये भारतीय संघाला 1-3 असा पराभव पत्करावा लागला.
Gautam Gambhir spotted at Siddhivinayak temple in Mumbai today to seek blessings.🙏
Take as many blessings as you want GG sir but India should win at least 2 matches in England otherwise you also know what will happen to you.🥺 pic.twitter.com/sb8NazR58y
— 𝐑𝐮𝐬𝐡𝐢𝐢𝐢⁴⁵ (@rushiii_12) May 15, 2025
त्याआधी भारताचा सामना न्यूझीलंडविरूध्द झाला होता. यामध्ये न्यूझीलंडने घरच्या मैदानावर भारताला क्लीन स्वीप केले होते. गंभीरच्या प्रशिक्षणाखाली भारतीय संघाने आतापर्यंत 10 कसोटी सामने खेळले आहेत. या काळात भारतीय संघाला फक्त 3 सामने जिंकता आले आहेत. भारतीय संघाला 6 सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे आणि 1 सामना अनिर्णित राहिला आहे.
भारताचा या इंग्लड दौऱ्यावर पुर्णपणे नवा संघ असणार आहे. कर्णधाराची कमान कोणाच्या हाती दिली जाणार हे पाहणे महत्वाचे ठरेल. भारताच्या संघाने गौतम गंभीरच्या कोचिंगमध्ये चॅम्पियन ट्रॅाफी नावावर केली आहे त्यानंतर भारतामध्ये उत्साहाचे वातावरण होते. भारताचे तीन अनुभवी खेळाडू रोहीत शर्मा, विराट कोहली आणि आर अश्विन यांनी कसोटी क्रिकेटमधुन निवृती घेतली आहे, त्यामुळे आता भारताचा संघ नव्या खेळाडूसह कशी कामगिरी करेल हे पाहणे महत्वाचे ठरेल.
पहिली कसोटी: 20-24 जून – हेडिंग्ले, लीड्स
दुसरी कसोटी: 2-6 जुलै – एजबॅस्टन, बर्मिंगहॅम
तिसरी कसोटी: 10-14 जुलै – लॉर्ड्स, लंडन
चौथी कसोटी: 23-27 जुलै – एमिरेट्स ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर
पाचवी कसोटी: 31 जुलै ते 4 ऑगस्ट – केनिंग्टन ओव्हल, लंडन