बर्मिंगहम : कॉमनवेल्थच्या आजच्या १० व्या दिवशी भारतीय खेळाडूंनी सुर्वण कामगिरी केली आहे. भारताचा बॉक्सर अमित पंघलने (Boxer Amit Panghal) आज सुवर्णपदकाला गवसणी घातली. (Gold Medal) तर नितूने (Nitu) सुद्धा सुवर्णपंच ठोकला. दुसरीकडे महिला हॉकी संघानेही इतिहास घडविताना कांस्यपदकाची कमाई केली. (Womens Hockey team) महिलांनी ऑलिम्पिकमधील पराभवाचे उट्टे काढले. त्यापाठोपाठ अॅथलेटिक्समध्ये पुरुषांच्या तिहेरी उडीत (Long jump) प्रविण चित्रावेल, (Pravin chitravel) अब्दुल्ला अबूबाकेर (Abdullah) व एलडोस पॉल (Paul) यांनी सुवर्ण कामगिरी केली आहे. (Gold Medal) पॉल व अब्दुल्ला यांनी अनुक्रमे सुवर्ण व रौप्यपदक निश्चित केले. तर कांस्यपदकाच्या शर्यतीत प्रविणला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. दरम्यान, मिल्खा सिंग, नीरज चोप्रा यांच्यानंतर अॅथलेटिक्समध्ये सुवर्णपदक जिंकणारा पॉल हा केवळ तिसरा भारतीय खेळाडू ठरला आहे.
Eldhose Paul moves to Gold Medal position with that huge 17.03m jump in the final of Men’s Triple Jump at the #CommonwealthGames2022 @birminghamcg22 pic.twitter.com/HpjXuZcOmr
— Athletics Federation of India (@afiindia) August 7, 2022
[read_also content=”आडनाव ठाकरे असेल तरच तो मुख्य पदावर दिसेल, तेजस ठाकरेंच्या राजकीय प्रवेशावरुन निलश राणेंची टिका https://www.navarashtra.com/maharashtra/tejas-thackeary-political-entry-on-nilesh-rane-313108/”]
दरम्यान, तिसऱ्या राऊंड अखेरीस पॉल १७.०३ मीटरसह अव्वल स्थानावर होता, तर चित्रावेल १६.७५ मीटर व अब्दुल्ला १६.७१ मीटर अशा कामगिरीसह अनुक्रमे तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावर होते. या तिघांमध्ये बर्म्युडाचा जाह-न्हाई पेरीनचिफ (१६.९२ मी.) हा दुसऱ्या क्रमांकावर होता. प्रविणला पाचव्या प्रयत्नात १६.८५ मीटर उडी मारता आली. बर्म्युडाचा पेरीनचिफ अजूनही तिसऱ्या क्रमांकावर कायम होता. प्रविणला अखेरच्या प्रयत्नात चांगली कामगिरी करून कांस्यपदकाच्या शर्यतीत येण्याची संधी होती, परंतु त्याला १६.२८ मीटर तिहेरी उडी मारता आली.