फोटो सौजन्य - IndianPremierLeague
Kolkata Knight Riders vs Gujarat Titans Match Report : केकेआर विरुद्ध जीटी यांच्यामध्ये सामना पार पडला. या सामन्यांमध्ये कोलकाता नाईट राइडर्सला हा सीझनचा पाचव्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. कोलकाताच्या गोलंदाजानी आज अत्यंत निराशाजनक कामगिरी केली त्यामुळे गुजरातच्या संघ मोठी धावसंख्या उभी करण्यात यशस्वी झाला होता. कोलकाताच्या संघाने पहिले दोन विकेट लवकर गमावले होते त्यामुळे संघाला धाव करण्यात कठीण झाले आणि रन रेट देखील वाढला आणि १९९ धावांचे लक्ष्य लांब राहिले. गुजरात टायटन्सच्या संघाने सहज विजय 39 धावांनी मिळवला. गुजरात टायटन्सच्या संघाने कोलकाताच्या त्यांच्या घरच्या मैदानावर पराभूत केलं.
कोलकाताच्या फलंदाजीचे सांगायचे झाले तर आज क्विंटन डी क्वाकच्या जागेवर आज अफगाणिस्तानचा विकेटकिपर आणि सलामीवीर फलंदाज गुरबाजला संघामध्ये स्थान मिळाले होते. पण तो काही विशेष कामगिरी करू शकला नाही. सुनील नारायणने देखील चांगली सुरुवात केली पण तो मोठी धावसंख्या उभी करण्यात अपयशी ठरला. सुनील नारायणने १३ चेंडूंमध्ये १७ धावा केल्या आणि रशीद खानाने त्याला बाहेरचा रस्ता दाखवला. नारायणचा विकेट गेल्यानंतर वेंकटेश अय्यर फलंदाजीसाठी आला होता पण तो फेल ठरला.
अजिंक्य रहाणेने आज अर्धशतक झळकावले, पण तो संघाला विजयापर्यत नेऊ शकला नाही. केकेआरचा कर्णधार अजिंक्य रहाणेने संघासाठी ३६ चेंडूंमध्ये ५० धावा केल्या. आंद्रे रसेल आज फलंदाजीसाठी आला होता त्याने संघासाठी १५ चेंडूंमध्ये २१ धावा केल्या. रमनदीप आणखी एकदा फेल ठरला. मोईन अली सुद्धा बॅटने विशेष कामगिरी करू शकला नाही.
Match 39. Gujarat Titans Won by 39 Run(s) https://t.co/TwaiwD55gP #KKRvGT #TATAIPL #IPL2025
— IndianPremierLeague (@IPL) April 21, 2025
सोमवारी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या आयपीएल सामन्यात गुजरात टायटन्सने कर्णधार शुभमन गिल आणि साई सुदर्शन यांच्या शानदार अर्धशतकांच्या जोरावर ३ बाद १९८ धावा केल्या. गिलने ५५ चेंडूत १० चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ९० धावा केल्या. त्याने साई सुधरसनसोबत पहिल्या विकेटसाठी ११४ धावांची भागीदारी केली आणि नंतर जोस बटलरसोबत ५८ धावांची भागीदारी केली. साई सुदर्शनने ३६ चेंडूत ६ चौकार आणि १ षटकारासह ५२ धावा केल्या. त्याच वेळी, जोस बटलरने फक्त २३ चेंडूत ८ चौकारांसह नाबाद ४१ धावा केल्या. कोलकाताकडून वैभव अरोरा याने ४४ धावांत १ बळी घेतला आणि हर्षित राणाने ४५ धावांत १ बळी घेतला. आंद्रे रसेललाही १ विकेट मिळाली, त्याने फक्त १३ धावा दिल्या. तथापि, वैभव आणि हर्षित दोघेही खूप महागडे निघाले.