फोटो सौजन्य - Mumbai Indians सोशल मीडिया
आयपीएल २०२५ वेळापत्रक : बीसीसीआयने रविवारी आयपीएलच्या १८ व्या हंगामाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. बीसीसीआयच्या मते, आयपीएलच्या या सीझनचे सामने १३ ठिकाणी एकूण ७४ सामने खेळवले जाणार आहेत. इंडियन प्रीमियर लीग २०२५ ची सुरुवात २२ मार्च रोजी ईडन गार्डन्सवर गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामन्याने होणार आहेत. पाच वेळा विजेता मुंबई इंडियन्स २३ मार्च रोजी चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध पहिला सामना खेळेल. मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्या पहिला सामना खेळणार नाही यामागचं कारण काय आहे हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स म्हणजेच आयपीएलचा भारत पाकिस्तान सामना म्हंटल तरी वावगं ठरणार नाही. या दोन्ही संघामधील सामना पाहण्यासाठी चाहते प्रचंड उत्सुक असतात. मुंबई इंडियन्स संघ आगामी हंगामात चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सामन्याने आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. गेल्या हंगामात एमआयची कामगिरी खराब राहिली कारण त्यांनी १४ पैकी १० सामने गमावले आणि १० व्या स्थानावर राहिले.
लखनौ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील शेवटच्या आयपीएल २०२४ च्या ग्रुप स्टेज सामन्यानंतर हार्दिक पंड्याला ३० लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता आणि त्याला आयपीएल २०२५ मधील फ्रँचायझीच्या पहिल्या सामन्यातूनही निलंबित करण्यात आले होते.
लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध स्लो ओव्हर रेटसाठी हार्दिकला ३० लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. या हंगामात तिसऱ्यांदा एमआय ओव्हर-रेटमध्ये मागे पडला, ज्यामुळे त्यांचा कर्णधार पंड्यावर एका सामन्याची बंदी घालण्यात आली. हेच कारण आहे की हार्दिक आगामी हंगामात संघाच्या पहिल्या सामन्यात खेळताना दिसणार नाही. तथापि, त्याच्या जागी संघाचे कर्णधारपद कोण स्वीकारेल हे फ्रँचायझी सामन्यापूर्वी जाहीर करेल.
फ्रँचायझी नाराज! Travis Head आणि Pat Cummins या लीगमध्ये खेळणार नाहीत, सीझनच्या आधीच घेतला निर्णय
रोहित शर्मा हा मुंबई इंडियन्सचा सर्वात यशस्वी कर्णधार राहिला आहे, परंतु गेल्या हंगामापूर्वी फ्रँचायझीने त्याच्यापासून वेगळे होऊन हार्दिकला संघाचा नवीन कर्णधार म्हणून नियुक्त केले होते, अशा परिस्थितीत हार्दिकच्या जागी सूर्यकुमार यादव संघाची कमान सांभाळू शकतो. सूर्यकुमार यादव हा भारतीय टी-२० संघाचा कर्णधार देखील आहे.
प्रत्येक संघ या सीझनमध्ये १४ सामने खेळणार आहे. या सीझनमध्ये १० संघ सहभागी झाले आहेत. यामध्ये अनेक संघाचे कर्णधार त्याचबरोबर खेळाडू वेगवेगळ्या संघाकडून खेळताना दिसणार आहेत.
मुंबई इंडियन्स
चेन्नई सुपर किंग्स
लखनौ सुपर जायंट्स
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
दिल्ली कॅपिटल्स
पंजाब किंग्स
गुजरात टायटन्स
राजस्थान रॉयल्स
कोलकाता नाईट रायडर्स
सनराइझर्स हैदराबाद