फोटो सौजन्य - Women's Premier League (WPL) सोशल मीडिया
महिला प्रीमियर लीग २०२५ : काल म्हणजेच १६ फेब्रुवारी रोजी रविवारी महिला प्रीमियर लीगमध्ये यूपी वॉरियर्सचा सामना गुजरात जायंट्सशी झाला. गुजरात जायंट्सला पहिल्या सामान्यांमधील पराभवानंतर गुजरातने या हंगामातील पहिला विजय नोंदवला आहे. त्यांनी युपी वॉरियर्सचा ६ गडी राखून पराभव केला आहे. पहिल्या सामन्यात गुजरातला पराभवाचा सामना करावा लागला. १४४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरातची सुरुवात चांगली झाली नाही. संघाची पहिली विकेट फक्त १ धावेवर पडली. बेथ मुनी तिचे खाते न उघडताच बाद झाली. त्याच्या बाद झाल्यानंतर, हेमलता देखील तिचे खाते न उघडता बाद झाली. दोन विकेट पडल्यानंतर, लॉरा वोल्वार्ड आणि अॅशले गार्डनर यांनी डावाची सूत्रे हाती घेतली.
फ्रँचायझी नाराज! Travis Head आणि Pat Cummins या लीगमध्ये खेळणार नाहीत, सीझनच्या आधीच घेतला निर्णय
दोघांनीही ५५ धावांची भागीदारी केली. लॉरा वोल्वार्ड २२ धावा करून बाद झाली. त्याच वेळी, कर्णधार अॅशले गार्डनरने तिचे अर्धशतक पूर्ण केले. तथापि, ती अर्धशतक पूर्ण केल्यानंतर बाद झाली. त्याने ३२ चेंडूत ५२ धावांची खेळी केली. त्याच्या बाद झाल्यानंतर, हरलीन आणि डायंड्रा यांनी डावाची जबाबदारी घेतली. दोघांनीही संघाला विजयाकडे नेले. दोघांनीही ५८ धावांची भागीदारी केली. यादरम्यान, हरलीनने ३४ आणि डिएंड्रा डॉटिनने ३३ धावा केल्या.
Deandra Dottin 🤝 Harleen Deol
The duo looking to guide #GG with a solid partnership 🙌
Updates ▶ https://t.co/KpTdz5nl8D#TATAWPL | #GGvUPW | @Dottin_5 | @imharleenDeol pic.twitter.com/bgdYWAKeXB
— Women’s Premier League (WPL) (@wplt20) February 16, 2025
प्रथम फलंदाजी करताना यूपी वॉरियर्स संघाला काही विशेष कामगिरी करता आली नाही. प्रथम फलंदाजी करताना यूपी वॉरियर्स संघाला नऊ विकेटच्या मोबदल्यात फक्त १४३ धावा करता आल्या. या सामन्यात युवा फिरकी गोलंदाज प्रिया मिश्राने शानदार गोलंदाजी केली. त्याने चार षटकांत २५ धावा देत तीन विकेट्स घेतल्या. कर्णधार अॅशले गार्डनरने ३९ धावांत दोन आणि डिएंड्रा डॉटिनने ३४ धावांत दोन बळी घेतले. दरम्यान, केशवी गौतमला एक विकेट मिळाली.
यूपी वॉरियर्सकडून कर्णधार दीप्ती शर्मा (३९), उमा छेत्री (२४) आणि श्वेता सहरावत (१६) यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. याशिवाय, अलाना किंग (१९) आणि सायमा ठाकोर (१५) यांनी शेवटच्या षटकात जलद धावा करून संघाला १४० च्या पुढे नेले.
आज दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आमनेसामने असणार आहेत. यामध्ये टीम इंडियाच्या दमदार खेळाडू आणि मैत्रिणी स्मृती मानधना आणि जेमिमा रोड्रिस एकमेकांच्या विरोधात आज लढताना दिसणार आहेत. हा सामना या सीझनचा चौथा सामना असणार आहे. तर दोन्ही संघाचा हा दुसरा सामना असणार आहे. दोन्ही संघानी पहिल्या सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे.