फोटो सौजन्य - X सोशल मीडिया
पॅट कमिन्स – ट्रॅव्हिस हेड : आयपीएलमध्ये आपल्या स्फोटक फलंदाजीने खळबळ उडवून देणारा ट्रॅव्हिस हेड आणि गेल्या हंगामात सनरायझर्स हैदराबादला अंतिम फेरीत पोहोचवणारा कर्णधार पॅट कमिन्स यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. हे दोन्ही ऑस्ट्रेलियन खेळाडू मेजर लीग क्रिकेट-२०२५ हंगामात सहभागी होणार नाहीत. हेडने आपल्या स्फोटक फलंदाजीने वॉशिंग्टन फ्रीडमला विजेतेपद जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने नऊ डावांमध्ये एकूण ३३६ धावा केल्या. तो हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर होता. हेडने काही दिवसांपूर्वी सांगितले होते की ते फ्रँचायझी क्रिकेट खेळण्यावर मर्यादा घालणार आहे.
WPL 2025 : दीप्ती शर्मा आणि ऍशलेह गार्डनर आज भिडणार, कशी असेल दोन्ही संघाची संभाव्य Playing 11
फ्रीडमने ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथला कायम ठेवले आहे. तथापि, त्याची उपलब्धता ऑस्ट्रेलियन संघाच्या कसोटी सामन्यांवर अवलंबून असेल. फ्रीडमच्या संघाने सर्वाधिक स्थानिक क्रिकेटपटूंना कायम ठेवले आहे. याशिवाय, फ्रीडमने सर्वाधिक परदेशी खेळाडूंना कायम ठेवले आहे. स्मिथ व्यतिरिक्त, फ्रँचायझीने ऑस्ट्रेलियाचे ग्लेन मॅक्सवेल, जॅक एडवर्ड्स आणि न्यूझीलंडचे लॉकी फर्ग्युसन यांना कायम ठेवले आहे. अकील हुसेन आणि अँड्र्यू टाय यांना संघाने सोडले आहे.
कमिन्स व्यतिरिक्त, युनिकॉर्न्सना जोश इंगलिसची सेवाही मिळणार नाही. याचे कारण ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी मालिका आहे. या संघात हरिस रौफ हा एकमेव पाकिस्तानी खेळाडू आहे. फ्रँचायझीने जॅक फ्रेझर मॅकगर्क, मॅथ्यू शॉर्ट आणि फिन ऍलन यांना कायम ठेवले आहे. एमआय न्यू यॉर्कने टिन डेव्हिडला कायम ठेवले आहे, तर दक्षिण आफ्रिकेच्या कागिसो रबाडाला फ्रँचायझीने कायम ठेवले नाही, तर डेवाल्ड ब्रेव्हिसच्या बाबतीतही असेच आहे. संघाने किरॉन पोलार्ड, निकोलस पूरन, रशीद खान आणि ट्रेंट बोल्ट यांनाही कायम ठेवलेले नाही. ऑर्कास फ्रँचायझीने दक्षिण आफ्रिकेचे रायन रिकेलटन आणि हेनरिक क्लासेन याला कायम ठेवले आहे. क्विंटन डी कॉकला संघाने सोडले आहे. फ्रँचायझीने मिशेल ब्रेसवेल आणि नॅन्ड्रे बर्गर यांना रिलीज केले आहे.
चेन्नई सुपर किंग्ज फ्रँचायझीचा संघ टेक्सासने आपला कर्णधार फाफ डु प्लेसिसला कायम ठेवले आहे. यावेळी या संघात मार्कस स्टोइनिस आणि डेव्हॉन कॉनवे ही जोडी पुन्हा एकदा दिसणार आहे. संघाने मिचेल सँटनर, डॅरिल मिचेल, नवीन उल हक आणि एडेन मार्कराम यांना कायम ठेवलेले नाही. लॉस एंजेलिस नाईट रायडर्सने संघात अनेक बदल केले आहेत. सुनील नरेन आणि आंद्रे रसेल यांना फ्रँचायझीने कायम ठेवले आहे. जेसन रॉयला संघाने सोडले आहे. डेव्हिड मिलर, अॅलेक्स कॅरी, शकिब अल हसन आणि जोश लिटल यांना संघात स्थान देण्यात आले आहे.