गौतम गंभीर(फोटो-सोशल मीडिया)
Gautam Gambhir’s statement on Rohit Sharma and Virat Kohli : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मलिका नुकतीच संपली. या मालिकेतील दूसरा सामना नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवण्यात आला होता. या सामन्यात भारतीय क्रिकेट संघाने वेस्ट इंडिजचा ७ विकेट्सने पराभव करून २-० अशी मालिका जिंकली. या विजयासह भारतीय संघाने घरच्या मैदानावर आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. भारताचा आगामी दौरा ऑस्ट्रेलियाचा असणार आहे. जिथे भारतीय संघ तीन एकदिवसीय आणि पाच टी-२० सामने खेळणार आहे.
माजी कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली ही अनुभवी जोडी या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात एकदिवसीय मालिकेसाठी संघाचा भाग आहेत. दरम्यान, नवी दिल्ली कसोटीनंतर पत्रकार परिषदेत जेव्हा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांना या दोन्ही खेळाडूंच्या भविष्याबद्दल विचारणा करण्यात आली. तेव्हा त्यांची प्रतिक्रिया चर्चेचा विषय ठरली आहे. गंभीरच्या विधानावरून असे दिसून आले की संघ व्यवस्थापन भविष्यात दोन्ही वरिष्ठ खेळाडूंच्या भूमिकांवर गांभीर्याने विचार करत आहे.
मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरला ऑस्ट्रेलिया एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडियाचा भाग असणाऱ्या रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या २०२७ च्या विश्वचषकात खेळण्याच्या शक्यतेबद्दल विचारणा करण्यात आली. मुख्य कोच गौतम गंभीरच्या उत्तरामुळे वनडे कारकिर्दीवर आणि पुढील विश्वचषकात भारतीय संघातील दोन सर्वात अनुभवी फलंदाज खेळण्याच्या शक्यतेवर आता शंका निर्माण झालेचे दिसत आहे.
गौतम गंभीर म्हणाला की, “५० षटकांचा विश्वचषकाला वेळ आहे, हा विश्वचषक अजून अडीच वर्षे दूर आहे. मला वाटते की वर्तमानात राहणे खूप महत्वाचे असुन दोघेही उत्कृष्ट खेळाडू आहेत, ते पुनरागमन करत आहेत आणि त्यांचा अनुभव ऑस्ट्रेलियामध्ये उपयुक्त ठरणार आहे. आशा आहे की त्यांचा दौरा हा यशस्वी होईल आणि त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे, एक संघ म्हणून आमची मालिका यशस्वी ठरेल.”
मुख्य कोच गौतम गंभीरने रोहित आणि विराट यांच्या उत्तराकडे जर नीट अभ्यासाने बघितले तर दोन तर्क समोर येतात. एक म्हणजे विश्वचषक अद्याप अडीच वर्षे दूर आहे. खरंच, हे सूचित करते की रोहित आणि विराट पुढील विश्वचषकापर्यंत ४० वर्षांच्या जवळपास असणार आहे. त्यामुळे त्यांची तंदुरुस्ती महत्त्वाची असणार आहे. शिवाय, गंभीरने दोन्ही खेळाडूंच्या यशस्वी दौऱ्यांचा उल्लेख करण्यात आला आहे. यावरून हे देखील स्पष्ट होते की रोहित आणि विराटने धावा काढाव्या लागणार आहे.