फोटो सौजन्य - MI New York
MI New York vs Seattle Orcas match report : मेजर क्रिकेट लीग सध्या सुरु आहे, या स्पर्धेचा आज 9 वा सामना पार पडला. हा सामना एमआय न्युऑर्क विरुद्ध सिएटल ऑर्कास या दोन संघामध्ये रंगला होता. या सामन्यात एमआय न्युऑर्कच्या संघाने स्पर्धेमध्ये चांगला कमबॅक केला आहे. सिएटल ऑर्कासच्या संघाला या स्पर्धेमध्ये सलग तिसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. एमआय न्युऑर्कच्या संघाने या सामन्यात विजय मिळवुन गुणतालिकेमध्ये चौथे स्थान गाठले आहे. या सामन्यात मोहक पटेल याने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.
मेजर लीग क्रिकेट 2025 मध्ये एमआय न्यू यॉर्कचा फलंदाज मोनांक पटेलची स्फोटक शैली पाहायला मिळाली आहे. एमआय न्यू यॉर्क विरुद्ध सिएटल ऑर्कास सामन्यात मोनांकने ऑर्कासच्या गोलंदाजांना खूप मारहाण केली. ज्यामुळे त्याने मेजर लीग क्रिकेटमध्ये ऐतिहासिक कामगिरी केली आहे. मोनांक पटेल आता मेजर लीग क्रिकेटमध्ये सर्वात मोठी खेळी खेळणारा पहिला अमेरिकन खेळाडू बनला आहे.
एमआय न्यू यॉर्क विरुद्ध सिएटल ऑर्कास सामन्यात मोनांक पटेलने शतक हुकवले असेल, पण त्याने इतिहास रचला. सिएटल ऑर्कासला हरवताना मोनांकने 50 चेंडूत 93 धावा केल्या. त्याच्या खेळीदरम्यान मोनांकने 8 चौकार आणि 7 षटकार मारले. आता मेजर लीग क्रिकेटमध्ये सर्वात मोठी खेळी करणारा मोनांक अमेरिकेचा पहिला क्रिकेटपटू बनला आहे.
𝗛𝗜𝗚𝗛𝗘𝗦𝗧 𝗦𝗖𝗢𝗥𝗘 by an 🇺🇸 player in the #MLC 🔥#OneFamily #MINewYork #MLC #MINYvSO pic.twitter.com/FF9ZvmGgII
— MI New York (@MINYCricket) June 19, 2025
एमआय न्यू यॉर्क विरुद्ध सिएटल ऑर्कास या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना सिएटल ऑर्कासने 20 षटकांत 5 गडी गमावून 200 धावा केल्या. सिएटल ऑर्कासकडून फलंदाजी करताना काइल मेयर्सने 46 चेंडूत 88 धावा केल्या. याशिवाय शायन जहांगीरने 43 धावा केल्या. कर्णधार हेनरिक क्लासेनने नाबाद 27 धावा केल्या. सिएटल ऑर्कासकडून गोलंदाजी करताना नविल उल हकने 2 बळी घेतले, परंतु तो सर्वात महागडा ठरला. त्याने 4 षटकांत 64 धावा दिल्या.
मेजर क्रिकेट लीगच्या गुणतालिकेबद्दल सागायचे झाले तर पहिल्या स्थानावर सॅन फ्रॅन्सिको युनिकाॅर्नचा संघ आहे, या संघाने ३ सामने खेळले आहेत यामध्ये तीनही सामने त्यांनी जिंकले आहेत. दुसऱ्या स्थानावर टेक्सास सुपर किंग्सचा संघ आहे त्यांनीदेखील सर्व सामने जिंकले आहेत. वाॅशिंग्टन फ्रिडमचा संघ तिसऱ्या स्थानावर आहे. त्यांनी ३ पैकी २ सामन्यात विजय मिळवला आहे. चौथ्या स्थानावर एमआय न्यऑर्कचा संघ आहे त्यांनी आजच्या सामन्यात पहिला विजय मिळवला आहे. पाचव्या आणि सहाव्या स्थानावर अनुक्रमे सिएटल ऑर्कास आणि एलए नाइट राइडर्सचा संघ आहे.